

३ नोव्हेंबरपासून सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन
मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनचे वेळापत्रक आले
मुंबई ते बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे प्रवासाचा वेळा ७ तासांनी कमी होणार
वंदे भारत स्लीपर ट्रेन पुणे आणि सोलापूर स्थानकावर थांबणार
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधीपासू धावणार याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे १ नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. तर ३ नोव्हेंबरपासून ही ट्रेन नियमित धावणार आहे. ही ट्रेन सुरू झाल्यावर मुंबईवरून थेट बंगळुरूला सुसाट जाता येणार आहे. या ट्रेनमुळे प्रवासाचा कालावधी तब्बल ६ ते ८ तासांनी कमी होणार आहे.
गाडी क्रमांक २७६५१ मुंबई (CSMT) – बंगळुरू (SMVT) वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस ३ नोव्हेंबर २०२६ पासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मुंबई ते बंगळुरू या दोन शहरातील अंतर १,११८ किमी इतके आहे. या प्रवासासाठी सध्या २४ ते २५ तासांचा वेळ लागतो. आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर या प्रवासाचे तास कमी होणार आहे. मुंबईवरून बंगळुरूला फक्त १६ तासांत पोहचता येणार आहे.
मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन सोमवार वगळता आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. गाडी क्र. २७६५२ बंगळुरू - मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन बंगळुरूवरून संध्याकाळी १९:४५ वाजता सुटेल. ही ट्रेन मुंबईत दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता पोहचेल. या ट्रेनचा एकूण प्रवासाचा वेळ १६ तास १० मिनिटे इतका आहे.
गाडी क्र. २७६५१ मुंबई -बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन मंगळवार वगळता आठवड्यातील ६ दिवस धावेल. ही ट्रेन मुंबईतील सीएसएमटी स्थानकावरून रात्री २०.१० वाजता सुटेल. ती बंगळुरूमध्ये दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहचेल. या प्रवासाचा एकूण वेळ १५ तास ५० मिनिटं इकते आहे.
- SMVT बंगळुरू : सायंकाळी १९:४५ सुटेल
- अनंतपूर : २२:२८ / २२:३०
- गुंटकल : २३:२० / २३:२५
- रायचूर : ०१:०३ / ०१:०५
- यादगीर : ०१:४३ / ०१:४५
- कलबुर्गी : ०३:०८ / ०३:१०
- सोलापूर : ०४:२० / ०४:२५
- पुणे : ०८:०० / ०८:०५
- कल्याण : १०:४२ / १०:४४
- मुंबई CSMT : सकाळी ११:५५ पोहोचेल
- मुंबई CSMT : रात्री २०:१० सुटेल
- कल्याण : २०:४८ / २०:५०
- पुणे : २३:४० / २३:४५
- सोलापूर : ०३:०० / ०३:०५
- कलबुर्गी : ०४:१३ / ०४:१५
- यादगीर : ०५:०८ / ०५:१०
- रायचूर : ०६:०३ / ०६:०५
- गुंटकल : ०७:३० / ०७:३५
- अनंतपूर : ०८:३८ / ०८:४०
- SMVT बंगळुरू : दुपारी १२:०० पोहोचेल
मुंबई ते बंगळुरू दरम्यानचा १,११८ किमीचा प्रवास ही ट्रेन अवघ्या १५ तास ५० मिनिटांत पूर्ण करणार आहे. ही ट्रेन सोलापूर, पुणे, कलबुर्गी, आणि कल्याणमधील प्रवाशांसाठी फायदेशीर आहे. या ट्रेनमुळे बंगळुरू आणि मुंबई दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रात्रीचा प्रवास करता येणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन १६ डब्यांची आहे. या ट्रेनमधून एकाचवेळी ८२३ प्रवासी प्रवास करू शकतात. ही ट्रेनअनंतपूर, गुंटकल, रायचूर, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण या स्थानकावर थांबणार आहे. बंगळुरू- मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या १,११८ किलोमीटरच्या प्रवासासाठी तिकीट दर २,६०० ते ४,२५० रुपयांपर्यंत असतील, असा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.