New Rules 2023 : २०२२ वर्षाचे आता शेवटचे काही तास उरले आहेत. उद्यापासून नवीन वर्षाला सुरूवात होईल. तसं पाहता प्रत्येक महिना आपल्यासाठी काही नवे बदल घेऊन येत असतो. त्याचप्रमाणे नव्या वर्षाच्या सुरूवातीलाही काही महत्वाचे बदल होणार आहे. या बदलाचा परिणाम थेट तुमच्या जीवनावर होईल. चला तर मग जाणून घेऊयात नवीन वर्षात कोणते बदल होणार. (Latest Marathi News)
नवीन वर्षात वाहनांच्या किंमती वाढणार!
तुम्ही जर नवीन वर्षात नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला अधिकच झळ बसू शकते. कारण २०२३ मध्ये नवीन वाहनांच्या किंमतीत वाढ होणार आहे. एमजी मोटर, मारुति सुजुकी, ह्युंडई मोटर्स, होंडा, टाटा मोटर्स, रेनॉल्ट, ऑडी आणि मर्सिडीज-बेंच या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
बँक लॉकरचे नियम बदलणार
नवीन वर्षात बँक लॉकरचे नियम बदलणार आहे. रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी बँक लॉकरसंबंधित नवे नियम जाहीर केले, ज्याची १ जानेवारी २०२३ पासून अंमलबजावणी केली जाईल. नियम लागू झाल्यानंतर लॉकरबाबत बँकेच्या मनमानी कारभाराला ब्रेक लागेल. बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकेची असेल.
क्रेडिट कार्डचे नियम बदलणार
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच क्रेडिट क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. हा बदल क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित असेल. ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये उर्वरित सर्व रिवॉर्ड पॉइंट्स भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १ जानेवारी २०२३ पासून नवीन नियमांनुसार रिवॉर्ड पॉइंट सुविधा प्रदान केल्या जातील.
गँस सिलेंडरच्या किंमती बदलणार
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच गँस सिलिंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. कच्चा तेलाच्या किंमतीत होणारी घसरण पाहता, तेल कंपन्यांकडून गँस सिलिंडरच्या दरात कपात केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, महागाईत होरपळून निघालेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
...तर तुमचे पॅन कार्ड होऊ शकते रद्द
नवीन वर्षात तुम्हाला तुमचे आधारकार्ड पॅनकार्डसोबत जोडणे बंधनकारक आहे. ज्या लोकांनी हे काम केलं नाही, त्यांचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते. हा बदल जानेवारीऐवजी एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून लागू होणार आहे. “आधारशी पॅन लिंक करणे अनिवार्य आहे, ते आवश्यक आहे. उशीर करू नका, आजच लिंक करा!” असं आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.