Gujarat Navsari Bus Accident : भरधाव वेगात असणाऱ्या बसच्या चालकाला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट समोरून येणाऱ्या कारला धडकली. या घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
प्राप्त माहितीनुसार, गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस ही सूरतहून वलसाडच्या दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या फॉर्च्यूनर कारमधून ९ जण प्रवास करीत होते.
दरम्यान, बस वेस्मा गावाजवळ आली असता, बसचालकाला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बसने थेट फॉर्च्यूनर कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर मृतांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहेत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन्ही वाहने कापावी लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.