VIDEO : अरे बापरे! मध्यरात्री ७२ इंचाची जलवाहिनी फुटली; तब्बल ४०० घरात शिरलं पाणी, रस्त्यांना नदीचं स्वरूप

घाटकोपरच्या मेट्रोल असल्फा परिसरात जलवाहिनी फुटली. त्यामुळे ऐन हिवाळ्यात मुंबईमध्ये पूरपरिस्थिती पाहायला मिळाली.
Ghatkopar Pipe Line Burst
Ghatkopar Pipe Line BurstSaam TV
Published On

Ghatkopar Pipe Line Burst : घाटकोपरच्या मेट्रोल असल्फा परिसरात जलवाहिनी फुटली. त्यामुळे ऐन हिवाळ्यात मुंबईमध्ये पूरपरिस्थिती पाहायला मिळाली. ७२ इंचाची जलवाहिनी फुटल्याने तब्बल ४०० हून अधिक घरात पाणी शिरलं. या पाण्याचा प्रवाह इतका होता की, यात अनेक दुचाकी, घरांच्या आजूबाजूचे तसेच दुकानांसमोरील साहित्य वाहून गेले.(Latest Marathi News)

Ghatkopar Pipe Line Burst
Palghar Crime : पहाटे रनिंग करण्यासाठी घराबाहेर पडली; २० वर्षीय तरुणीसोबत घडली भयंकर घटना

शुक्रवारी (30 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास लोक घरात झोपलेले असताना अचानक ७२ इंचाची पाण्याची पाईपलाईन फुटली. या जलवाहिनीतून पाणी इतक्या वेगाने बाहेर आले की अनेक घरे, परिसर आणि रस्ते पाण्याखाली गेले. अचानक घरात आलेल्या पाण्यामुळे लोक घाबरले, गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या पाण्याचा दाब इतका जोरदार होता, की ते सुमारे 10 फुटांपर्यंत उसळत होते. मध्यरात्री अडीज वाजेच्या सुमारास पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळविण्यात आली. मात्र पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दरम्यान, या जलवाहिनीतून पाण्याचा वेग अद्यापही कमी झालेला नाही, घराबाहेर पडणारे लोक पाण्याचा वेग लवकरात लवकर कमी व्हावा अशी प्रार्थना करत आहेत.ही जलवाहिनी अतिशय जीर्ण झालेली आहे. त्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटल्याच्या घटना घडत आहे. या आधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरशः घरे कोसळली होती. तर आता देखील ही जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com