NEET UG Exam Paper Leak Case Saam tv
देश विदेश

NEET UG परीक्षा रद्द, आता पुढे काय? विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करून फी भरावी लागणार का?

NEET UG Exam Paper Leak Case: नीट पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा रद्द झाल्यामुळे आता पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आले आहेत. आता पुढे नेमकं काय होणार याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Priya More

Summary:

  • नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी चिंतेत

  • नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर पुढे काय?

  • विद्यार्थ्यांना पुन्हा फी भरावी लागणार का?

  • एनटीएने दिली नीट पुनर्परीक्षेबाबत महत्वाची माहिती

देशातील सर्वात मोठी मेडिकल प्रवेश परीक्षा नीट यूजी २०२६ दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. नीट पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या पेपरफुटी प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आता पुन्हा परीक्षाचे आयोजन केले जातणार आहे. परीक्षेच्या नव्या तारखेची लवकरच घोषणा केली जाणार आहे.

देशातील २५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. पण आता ही परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आले आहेत. प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. विद्यार्थी टेन्शन फ्री झाले होते पण आता पेपर फुटीमुळे परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

या पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयच्या माध्यमातून केला जात आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामध्ये देशभरातून १६ संशयित आरोपींना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्वांची चौकशी सुरू आहे. यामधील दोघे जण महाराष्ट्रातील आहेत. या प्रकरणात आर्थिक व्यवहार देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. १० लाखांना पेपर विकत घेऊन त्याची १५ लाखांमध्ये विक्री केली असल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या शुभम खैरनारला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शुभला सीबीआयकडे सोपवले जाणार असून ते त्याला दिल्लीला घेऊन जाणार आहेत. तर दुसरा संशयित आरोपी अहिल्यानगरचा असून तो पुण्यात राहतो.

परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे आता ती पुन्हा घेतली जाणार आहे. त्यामुळे आता पुन्हा नोंदणी करून परीक्षा फी भरावी लागणार की काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देत एनटीएने म्हटले आहे की, परीक्षेसाठी पुन्हा नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. मे २०२६ सत्रादरम्यान सादर केलेला नोंदणी डेटा, परीक्षा केंद्राचे पर्याय आणि उमेदवाराचा तपशील आपोआप वैध मानला जाईल.

तसंच, विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. यापूर्वी जमा केलेले शुल्क परत केले जाईल आणि एनटीएच्या अंतर्गत संसाधनांमार्फत परीक्षा पुन्हा घेतली जाईल. परीक्षेची नवीन तारीख, प्रवेशपत्र जारी करण्याचे वेळापत्रक आणि इतर महत्वाची माहिती संस्थांच्या अधिकृत माध्यमांवर प्रसिद्ध केली जाईल. संस्थेने विद्यार्थी आणि पालकांना केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आणि सोशल मीडियावर पसरणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT