पेमा खांडू हे पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. मुख्यमंत्री कोण होणार असल्याचे वृत्त माध्यमांत येताच तेथील राजकीय वर्तुळात उठलेलं तर्क-वितर्कांचं वादळ शांत झालं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पेमा खांडू हे हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत.
केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यात पेमा खांडू यांची अरुणाचल प्रदेशमधील विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर पेमा खांडू आता राज्यपाल केटी पर्नेलक यांची भेट घेतील. त्यानंतर सरकार स्थापनेचा दावा करणार करतील. दरम्यान, गुरुवारी अरुणाचल प्रदेशात नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे.
हा शपथविधी सोहळा उद्या इटानगर येथील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये होणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये, भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष यांच्या उपस्थितीत नवीन मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळासह सकाळी 11 वाजता शपथ घेतील.
कोण आहेत पेमा खांडू?
मुख्यमंत्री पेमा खांडू हे तिसऱ्यांदा मुख्यमत्रिपदी विराजमान होणार आहेत. पेमा खांडू हे अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे पुत्र आहेत. २०१६ मध्ये मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर ते ईशान्येतील एक मोठे नेते म्हणून उदयास आले. २०१६ मध्ये जेव्हा त्यांची देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.
सप्टेंबर २०१६ मध्ये खांडू यांनी काँग्रेस सोडली आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी याच वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत ६० सदस्यीय विधानसभेत ४६ जागा जिंकून भाजपने अरुणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत पुनरागमन केले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक पक्ष असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) पाच जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (एनसीपी) ३ आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलला (पीपीए) २ जागा मिळाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.