Odisha CM Majhi: मोहन चरण माझींना कधीकाळी झोपावं लागलं होतं फुटपाथवर; आज बनलेत ओडिशाचे मुख्यमंत्री

Odisha CM Majhi Slept On FootPath: ओडिशामधील पटनायक यांची सत्ता उलथवून लावत भाजपने आदिवासी समाजातील मोहन माझी यांना मुख्यमंत्रिपदी बसवलंय. ओडिशाचे मुख्यमंत्री झालेल्या माझी यांना एकेकाळी फुटपाथावर झोपावं लागलं होतं.
Odisha CM Majhi: मोहन चरण माझींना कधीकाळी झोपावं लागलं होतं फुटपाथवर; आज बनलेत ओडिशाचे मुख्यमंत्री
Odisha CM Majhi Slept On FootPath

भाजपने नवीन पटनायक यांची बीजू जनता दलची (बीजेडी) २४ वर्षांची सत्ता उलथवून लावली. पटनायक यांचा पराभव करत येथील आदिवासी व्यक्तीला मुख्यमंत्री पदावर बसवलंय. ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी अनेक जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी शेतकरी, RSS संचालित शाळेतील शिक्षक, सरपंच, आदिवासींच्या हक्कासाठी आणि खाण माफियांविरुद्ध लढणारे वकील म्हणून माझी यांनी काम केलंय.

दरम्यान तीनवेळा आमदार झालेल्या आणि आता मुख्यमंत्री झालेल्या मोहन माझी यांना फुटपाथवर झोपावं लागलं होतं. माझी यांच्या या विधानामुळे सर्व माध्यमांच्या हेडलाइमध्ये मोहन माझी आले होते. नेमका काय आहे हा किस्सा हे जाणून घेऊ.

पू्र्वेकडील राज्यात मुख्यमंत्री बनवणं हे भाजपचं मोठं यश आहे. पू्र्वेकडील राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपला ५२ वर्ष लागलीत. केओंझारमधील रायकला येथील माझी यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.RSS संचालित सरस्वती शिसू विद्या मंदिरात त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं आहे. माझी यांनी १९९७-२००० मध्ये सरपंच म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. २००० साली ते पहिल्यांदा राज्याच्या केओंझर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. आतापर्यंत ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले.

२००० ते २००९ या कालावधीत सलग दोनवेळा ते केओंझरमधून आमदार म्हणून निवडून आले. भाजपच्या आदिवासी मोर्चाचे सचिव म्हणून काम करताना माझी यांनी मोठी कामगिरी केली. माझी यांनी २०१९ मध्ये त्यांच्या नेतृ्त्वात भाजपाला उभारी दिली. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोहन माझी विजयी होत तिसऱ्यांदा आमदार झाले. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला.

दरम्यान आज मुख्यमंत्र्याच्या पदावर बसलेल्या माझी यांना एकदा फुटपाथवर झोपावं लागलं होतं. २००४ साली माझी यांनी केलेल्या एका विधानामुळे ते माध्यमांच्या हेडलाइनमध्ये आले होते. त्यांना सरकारी बंगला मिळाला नसल्याने त्यांना फुटपाथवर झोपावं लागलं होतं. माझी यांनी याची आपबीती ओडिशाच्या विधानसभेत सांगितली होती. विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर एक महिना उलटूनही घर न मिळाल्याने आपल्याला राज्याच्या राजधानीत फूटपाथवर झोपावं लागलं होतं, अशी माहिती माझी यांनी दिली होती, यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

Odisha CM Majhi: मोहन चरण माझींना कधीकाळी झोपावं लागलं होतं फुटपाथवर; आज बनलेत ओडिशाचे मुख्यमंत्री
Who is Mohan Charan Majhi: 4 वेळा आमदार, कणखर व खंबीर आदिवासी नेतृत्व; कोण आहेत ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com