Maharashtra Politics: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये धुसफूस? भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने

Vidhan Parishad Padvidhar Election Fight Between BJP Shiv Sena And NCP: विधानपरिषद निवडणुकीत महायुती आमनेसामने आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे.
विधानपरिषद निवडणुकीत महायुती आमनेसामने
Vidhan Parishad Padvidhar ElectionSaam Tv

गणेश कवडे, साम टीव्ही मुंबई

राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुती आमनेसामने असल्याचं दिसत आहे. मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

अर्ज मागे घेतला नाही, तर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभेच्या रिंगणात एकत्र लढलेल्या महायुतीध्ये बिघाडी झाल्याचं दिसत (Vidhan Parishad Padvidhar Election) आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीतील घटक पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामुळे विधान परिषद निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात?

विधान परिषदेची निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. ही निवडणूक चार जागांसाठी होणार असल्याची माहिती (BJP Shiv Sena And NCP) मिळतेय. निवडणुकीमध्ये महायुतीतील (Mahayuti) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत.

आता विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख संपली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढणार आहेत की, सामजस्यांने उमेदवार माघार घेणार, हे स्पष्ट पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीत महायुती आमनेसामने
Lok Sabha Election Results: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या घसरत्या आलेखाला जबाबदार कोण? प्रशांत किशोर यांनी दिलं उत्तर

महायुतीकडून कोणकोणते नेते रिंगणात?

मुंबई शिक्षक मतदारसंघात शिसवेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजप विरोधात शिवसेना सामना दिसत आहे. शिवसेनेचे शिवाजी शेडगे, (Mumbai Teacher And Graduates Constituencies) राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे, तर भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे एकमेकांविरोधात लढणार आहेत.

पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे दीपक सावंतविरुद्ध भाजपचे किरण शेलार अशी लढत होत (Maharashtra Politics) आहे. महायुतीत वितुष्ट झाल्यास त्याचा थेट फायदा ठाकरे गट आणि शिक्षक भारती संघटनेला होऊ शकतो. मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब, तर शिक्षक मतदारसंघात शिक्षक भारतीचे सुभाष मोरे उमेदवार आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत महायुती आमनेसामने
Maharashtra Election Result: '...तर भाजपच्या एक दोन जागा आल्या त्याही आल्या नसत्या'; सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम स्पष्टच बोलले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com