Maharashtra Election Result: '...तर भाजपच्या एक दोन जागा आल्या त्याही आल्या नसत्या'; सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम स्पष्टच बोलले

Vishwajeet Kadam on Sangli Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीत मेरिटवर जागा वाटल्या पाहिजेत हे ठरलं होतं. तरीही आम्ही शिवसेनेवर नाराज नाही. लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्यांच विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Election Result: '...तर भाजपच्या एक दोन जागा आल्या त्याही आल्या नसत्या'; सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम स्पष्टच बोलले
Vishal Patil and Vishwajeet KadamSaam Digital

सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय खेचून आणला आहे. गुरुवारी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी याची विश्वजित कदम यांच्यासह भेट घेऊन पाठिंबा दिला. त्यावर आज विश्वजीत कदम यांनी, सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली असली तरी ते देखील काँग्रेसचाच घटक आहेत. आम्ही सगळे इंडिया आघाडी सोबत होतो. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत सांगलीत जे घडलं त्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर नाराज नाही. पण जागावाटप ठरताना मरिटनुसार जागा देण्याचं ठरलं होतं. ते सांगलीत दिसलं नाही. तसं झालं असतं तर आज भाजपच्या ज्या एक दोन जागा आल्या आहेत त्या देखील मिळाल्या नसत्या. सांगली जिल्ह्याची परिस्थिती वेगळी होती. असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. वेळ पाहून उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले.

सांगलीची राजकीय परिस्थिती वेगळी- विशाल पाटील

अपक्ष उमेदवाराला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान मिळणं हे क्वचितच घडत.काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना माझ्या विजयाचं श्रेय्य जातं. जनतेने भाजपचा पराभव केला. जनतेने आणि आम्ही ठरवलं होतं, भाजपचा पराभव करायचा. तसंच प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. सांगलीची परिस्थिती आम्ही सातत्याने मांडत होतो.जिल्ह्यातल्या मतदारांच्या मनात काय हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो.जनतेने ही निवडणूक हातात घेतली.

Maharashtra Election Result: '...तर भाजपच्या एक दोन जागा आल्या त्याही आल्या नसत्या'; सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम स्पष्टच बोलले
Special Report : दादांचे आमदार पवारांच्या संपर्कात?; निकालानंतर आमदारांमध्ये अस्वस्थता?

महाविकास आघाडीचा हेतू होता भाजपचा पराभव करणे तो हेतू स्पष्ट झालेला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे आणि वसंतदादा घराण्याचे चांगले सबंध होते. वसंतदादांचा नातू निवडून आलाय म्हटल्यावर मला वाटतं नाही ते मनात राग धरतील. निवडणुकीत जे घडलं त्यातून कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. उद्धव ठाकरे आमच्या वडिलांसारखे आहेत. ते आम्हाला समजून घेतील. तसंच आम्ही काँग्रेसी विचारांचे आहोत, काँग्रेससोबत राहणार, असल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Election Result: '...तर भाजपच्या एक दोन जागा आल्या त्याही आल्या नसत्या'; सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम स्पष्टच बोलले
Special Report : ठाकरेंना मुस्लिमांची साथ?; मविआला अल्पसंख्याकांनी तारलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com