Special Report : दादांचे आमदार पवारांच्या संपर्कात?; निकालानंतर आमदारांमध्ये अस्वस्थता?

Maharashtra Politics 2024 : १० जागा लढवणा-या शरद पवार गटाला ८ जागा मिळाल्यात. जनतेची पवारांना बाजूने सहानभुती असल्यानं चित्र आहे. त्यामुळेच दादांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.
Special Report
Special ReportSaam Digital

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला अवघी १ जागा मिळाली. तर १० जागा लढवणा-या शरद पवार गटाला ८ जागा मिळाल्यात. जनतेची पवारांना बाजूने सहानभुती असल्यानं चित्र आहे. त्यामुळेच दादांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. पाहूया एक रिपोर्ट.

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल कोणाच्या बाजुनं जाणार याची उत्सुकता होती. मविआनं ३० जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. त्यात शरद पवार गटानं सर्वात उत्तम कामगिरी करत 10 जागा लढवून 8 जागा जिंकल्या. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे चार उमेदवार निवडणुकीत उभे होते. आणि केवळ रायगडमध्ये सुनील तटकरे यांचा विजय झाला. प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीतही सुप्रिया सुळेंनी मोठ्या फरकानं सुनेत्रा पवारांचा पराभव केला. त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यात काही आमदारांनी सुप्रिया सुळेंना अभिनंदनाचे मेसेज केले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दादांचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा रोहित पवारांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आमदारांची घरवापसी होण्याच्या धास्तीनं अजित पवारांनी सर्व आमदारांची मुंबईत हॉटेल ट्रायडन्ट येथे महत्त्वाची बैठक बोलावली. मात्र पाच आमदार या बैठकीला अनुपस्थित होते. गैरहजर असलेले अण्णा बनसोडे काय म्हटले ते पाहा. दरम्यान सर्व आमदार दादांच्या पाठिशी असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी म्हटलं आहे.

Special Report
Special Report : ठाकरेंना मुस्लिमांची साथ?; मविआला अल्पसंख्याकांनी तारलं?

अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत. तर शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत. राजकारणात भविष्यात काय होईल सांगता येत नाही. तसंच राजकारणात उगवत्या सुर्याला नमस्कार केला जातो. महाराष्ट्रातील हवा शरद पवारांच्या बाजुने असल्यानं विधानसभेसाठी दादांचे आमदार वेगळा विचार करणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Special Report
Special Report : कांद्यानं महायुतीला रडवलं; शेतकऱ्यांनी 7 जणांना दाखवलं अस्मान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com