Special Report : कांद्यानं महायुतीला रडवलं; शेतकऱ्यांनी 7 जणांना दाखवलं अस्मान

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत जे प्रमुख मुद्दे होते त्यामध्ये कांदा निर्यातबंदीचा मुद्दा ज्वलंत होता. या कांद्यामुळेच बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघामध्ये भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
Special Report
Special ReportSaam Digital
Published On

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत कांद्यानं महायुतीला रडवलं आहे. निर्यातबंदीच्या प्रश्नावरुन शेतक-यांचा सत्ताधा-यांवर रोष होता. त्याचे पडसाद निकालात उमटले आहेत. कांदा पट्ट्यात महायुतीच्या सात उमेदवारांचा पराभव झाला आहे. पाहूया एक रिपोर्ट.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत जे प्रमुख मुद्दे होते त्यामध्ये कांदा निर्यातबंदीचा मुद्दा ज्वलंत होता. या कांद्यामुळेच बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघामध्ये भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. दिंडोरी मतदारसंघात तर केंदीय राज्यमंत्री भारती पवारांना अनेक गावांमध्ये कांदा उत्पादकांच्या रोषाचा सामोरं जावं लागलं. नाशिकमधील पिंपळगाव इथं थेट पंतप्रधानांच्या सभेत कांदा प्रश्नावरुन गोंधळ झाला. कांद्यावर बोला अशी घोषणा देण्यात आली. महायुतीच्या उमेदवारांना अखेर कांद्यानं रडवलंच. देवेंद्र फडणवीसांनीही शेतक-यांच्या प्रश्नांचा फटका बसल्याची कबुली दिली.

Special Report
Ajit Pawar On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं ते विधान महागात पडलं; अजित पवारांची पत्रकार परिषदेत जाहीर नाराजी

मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र, शेतकऱ्यांचा कांदा बाजारात आला की सरकारच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. वाढलेले दर कमी होतात. यावर्षी देखील तसंच झालं. विरोधकांनीही हा मुद्दा उचलत सरकारवर हल्लाबोल केला. त्यामुळेच कांद्यानं महायुतीचा वांदा केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार कांद्याचं धोरण बदलणार का याकडे शेतक-यांचं लक्ष लागलंय.

Special Report
Ajit Pawar On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं ते विधान महागात पडलं; अजित पवारांची पत्रकार परिषदेत जाहीर नाराजी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com