मोहन चरण माझी यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. ते ओडिशाचे 16 वे मुख्यमंत्री असतील. माझी हे ओडिशाचे आदिवासी मुख्यमंत्री असतील. याशिवाय भाजप सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रीही असतील. ओडिशाच्या भाजप सरकारमध्ये केव्ही सिंगदेव आणि प्रवती परिदा हे दोन उपमुख्यमंत्री असतील.
उद्या म्हणजेच 12 जून रोजी ओडिशाच्या नव्या भाजप सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. 53 वर्षीय मोहन माझी हे आदिवासी समाजातील आहेत.
माझी हे केओंझार विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते त्यांच्या जनसेवा आणि संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जातात. यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री उमेदवार मोहन माझी यांनी बीजू जनता दलाच्या (बीजेडी) मीना माझी यांचा केओंझर विधानसभा मतदारसंघातून पराभव केला होता.
दरम्यान, 147 सदस्यीय ओडिशा विधानसभेत भाजपने 78 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. ओडिशाच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि भूपेंद्र यादव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली ज्यामध्ये मोहन मांझी यांची ओडिशाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. नवीन सरकार 12 जून रोजी शपथ घेणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.