Haryana politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा ट्विस्ट; हरियाणात काँग्रेस आणि 'आप'ची युती तुटली

Haryana political News : हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा ट्विस्ट झाला आहे. हरियाणात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती तुटली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि 'आप' स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.
Haryana politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा ट्विस्ट; हरियाणात काँग्रेस आणि 'आप'ची युती तुटली
Haryana politicsSaam tv

नवी दिल्ली : दिल्लीनंतर आता हरियाणामध्येही काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने युती तोडली आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांनी मोठी घोषणा केली आहे. भूपिंदर यांनी हरियाणा विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याआधी काँग्रेसने जाहीर केलं.

हरियाणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती तुटण्याचे काही दिवस आधीच संकेत मिळाले होते. काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी इंडिया आघाडीवर मोठं भाष्य केलं होतं. आम आदमी पक्षासोबतची युती लोकसभा निवडणुकीपर्यंत मर्यादित होती, असं वक्तव्य खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी केलं होतं.

Haryana politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा ट्विस्ट; हरियाणात काँग्रेस आणि 'आप'ची युती तुटली
Pune Viral Hording: पुणे म्हणजे 'विषय हार्ड'! हेल्मेट घालण्यासाठी अनोखी जनजागृती, थेट बाहुबलीला उतरवलं मैदानात; पाहा फोटो

'हरियाणात विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढण्यास सक्षम आहे. यामुळे हरियाणामध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार आहे. आम्हाला हरियाणाला वाचवायचं आहे. त्याचा विकास करायचा आहे, असं वक्तव्य खासदार हुड्डा यांनी केलं.

९० विधानसभा मतदारसंघ असलेल्या हरियाणा विधानसभेची निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर २०२४ रोज संपणार आहे. हरियाणामध्ये मागील १० वर्षात भाजपचं सरकार आहे.

Haryana politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा ट्विस्ट; हरियाणात काँग्रेस आणि 'आप'ची युती तुटली
Rashtrapati Bhavan Leopard Viral Video: राष्ट्रपती भवनात दिसलेल्या त्या प्राण्याचं रहस्य आलं समोर; दिल्ली पोलिसांनी उकललं गुढ

हरियाणामध्ये मागील दोन टर्म भाजप सरकार

लोकसभा निवडणुकीत हरियाणातील १० लोकसभा मतदारसंघापैकी ५ भाजप आणि ५ काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे हरियाणातील विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. तर लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने जेजेपीशी युती तोडली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली. हरियाणात भाजपने मनोहरलाल खट्टर यांच्या ऐवजी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर नायब सिंह सैनी यांना बसवलं. तर मनोहरलाल खट्टर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com