NCERT Saam Tv
देश विदेश

NCERT चा मोठा निर्णय! पुस्तकांमधून मुघल हद्दपार; 'बेटी बचाओ बेटी पढाओ'चा समावेश

NCERT Decision of Changes In Books: एनसीईआरटीने मोठा निर्णय घेतला आहे. आता पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीतील सुलतानशाहीचे सर्व संदर्भ काढून टाकले आहेत.

Siddhi Hande

NCERT ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली एनसीईआरटीच्या नवीन पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीच्या सुलतानशाहीचे सर्व संदर्भ काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारतीय राजघराणे, भूगोल, महाकुंभ आणि मेक इन इंडिया, बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या नवीन गोष्टींची माहिती मिळणार आहे.

एनसीईआरटीची ही नवीन पुस्तके या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही पाठपुस्तके नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन २०२३ च्या अनुषंगाने तयार करण्यात आली आहे. या नवीन धोरणानुसार शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय परंपरा, तत्वज्ञान, स्थानिक संदर्भांचा समावेश आहे.

या नवीन पाठ्यपुस्तकांबाबत माहिती समोर आली आहे. हा पुस्तकाचा केवळ पहिला भाग आहे. दुसरा भाग काही महिन्यात सादर केला जाईल, असं एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, या पाठ्यपुस्तकाच्या दुसऱ्या भागात काढून टाकलेले भाग कायम ठेवणार काही नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या तरी पहिल्या भागात मुघल आणि दिल्लीतील राजवटीचे संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत.

याआधीही एनसीईआरटीने मुघल आणि दिल्लीतील सुलतानशाहीचे काही संदर्भ काढून टाकले होते. यामध्ये तुघलक, खिलजी, लोधी या राजघराण्यांचा समावेश होता. त्यानंतर आता एनसीईआरटीच्या पहिल्या भागात हे सर्वच संदर्भ काढून टाकले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आता मुघल व दिल्लीतील सुलताशाहीबाबद कोणतेही संदर्भ पाठ्यपुस्तकांमध्ये वाचता येणार नाही. दरम्यान, विद्यार्थ्यांना सध्याचा भारत, योजना, महाकुंभ याबाबत माहिती पाठ्यपुस्तकांमध्ये मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

Wedding Look: या लग्नसराईसाठी जान्हवीचे 'हे' देसी लूक ट्राय करा, तुम्हीही दिसाल ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह

Liver Cancer Risk: कंबरदुखी वाढत चाललीये? लिव्हर कॅन्सरचा धोका नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Pune : पुण्यात भयंकर हत्याकांड, बिझनेसमनने बायकोचा गळा दाबला, भट्टीमध्ये बॉडी जाळली, अन् राख....

SCROLL FOR NEXT