DC VS RCB : पंड्याचा 'विराट' तडका, बेंगळुरूनं दिल्ली जिंकली, पॉईंट टेबलमध्ये नंबर 1

DC VS RCB IPL 2025 : अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यामध्ये बंगळुरूच्या संघाने दिल्लीवर मात केली. हा आरसीबीचा सलग तिसरा विजय आहे.
DC VS RCB IPL 2025
DC VS RCB IPL 2025X
Published On

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या लढतीत बंगळुरूचा ६ विकेट्सनी विजय झाला आहे. हा बंगळुरूचा सलग तिसरा विजय आहे. दिल्ली आणि बंगळुरू याआधी आयपीएल २०२५ मध्ये चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आमनेसामने आले होते, तेव्हा दिल्लीने सामने जिंकला होता. त्या पराभवाचा वचपा आज आरसीबीने अरुण जेटली स्टेडियमवर घेतला. या विजयाने बंगळुरू पॉईंट्स टेबलवर पहिल्या स्थानी पोहोचले आहेत. दुसऱ्या स्थानावरुन मुंबईचा संघ तिसऱ्या स्थानावर गेला आहे.

बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने २० ओव्हर्समध्ये १६२ धावा केल्या. केएल राहुलने दिल्लीकडून सर्वाधिक ४१ धावा केल्या. पोरेलने २८ धावा, फाफने २२ धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये ट्रिस्टन स्टब्सने आक्रमक खेळत ३४ धावा केल्या. पहिल्या इनिंगमध्ये बंगळुरूच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भुवनेश्वर कुमार ३ विकेट्स, हेजलवूडने २ विकेट्स घेतल्या. यश दयाल-कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

फिल सॉल्ट आजारी असल्याने जेकब बेथेलला संधी देण्यात आली. तो विराट कोहलीसह सलामीला उतरला. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीला आरसीबीला धक्के दिले. कॅप्टन अक्षर पटेल एकाच ओव्हरमध्ये बेथेल आणि देवदत्त पड्डिकल यांना माघारी पाठवले. त्यानंतर लगेच रजत पाटीदार बाद झाला. कृणाल पंड्याच्या साथीने विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. विराट कोहली ५१ धावा करुन तंबूत परतला. शेवटच्या ओव्हर्समध्ये टीम डेव्हिड-कृणाल पंड्याने आक्रमक खेळत बंगळुरूचा विजय निश्चित केला.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ :-

फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार

(सब्स्टिट्युट पर्याय - आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, जॅक फ्रेझर मॅकगर्क, माधव तिवारी, त्रिपुर्ण विजय)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची प्लेईंग ११ :-

विराट कोहली, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल

(सब्स्टिट्युट पर्याय - देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, स्वप्निल सिंग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com