Crime News: दिल्लीत विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला; तीन आरोपींना बेड्या

आरोपी मुलगा आणि पीडित मुलीची ओळख असल्याची माहिती समोर येत आहे.
Crime News
Crime NewsSaam TV
Published On

नवी दिल्ली :दिल्लीत बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची अत्यंत भयानक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. राजधानीच्या द्वारका मोड भागात झालेल्या या घटनेत पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. या विद्यार्थीनीला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपी मुलगा आणि पीडित मुलीची ओळख असल्याची माहिती समोर येत आहे. तरुणीवर झालेल्या या अॅसिड हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. डीसीपी एम हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

Crime News
Crime : क्रूरतेचा कळस! दिल्लीनंतर आता कर्नाटक हादरलं; मुलाकडून वडिलांची हत्या, मृतदेहाचे केले ३२ तुकडे

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पश्चिम दिल्लीतील उत्तम नगर येथील मोहन गार्डन परिसरात एका 17 वर्षीय मुलीला शाळेत जात होती. त्यावेळी बाईकवरून आलेल्या दोन व्यक्तींनी तिच्यावर अॅसिड फेकलं. या अॅसिड हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Delhi News)

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. डीसीपी एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, आरोपींनी पीडितेच्या घराची रेकी केली असावी. दोन्ही आरोपी पीडितेच्या घराजवळ राहत होते.

Crime News
West Bengal : आई बाबांना घरात ठेवले कोंडून; ५ व्या मजल्यावरून घेतली खाली उडी; प्रसिद्ध यूट्यूबरच्या कृत्याने नेटकरी चिंतेत

तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, मुलीने कधीही आपल्याला कुणाकडून छेडछाड होत असल्याची तक्रार केली नव्हती. ती तिच्या बहिणीसोबत मेट्रो स्टेशनच्या दिशेने जात असताना तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर पीडितेला असह्य वेदना होत होत्या. तेव्हा ती मदतीसाठी जवळच्या दुकानांकडे धावली तेव्हा एका दुकानदाराने वेदना कमी करण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर दूध ओतले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे अजिबात सहन करता येणार नाही, असे ट्विट त्यांनी केले. गुन्हेगारांना एवढी हिंमत कशी काय आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिल्लीतील प्रत्येक मुलीची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com