बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन, सोशल मीडियावर केली भावुक पोस्ट

bollywood actress close friend death : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झालं आहे.
marce pedrozo death
bollywood actress close friend deathSaam tv
Published On
Summary

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिच्या जवळच्या मित्राचे निधन

सेलिब्रिटी हेयर स्टायलिस्ट मार्से पेड्रोजो याचं निधन

नोरा फतेहीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीला मोठा धक्का बसला आहे. नोराचा जवळचा मित्र आणि सेलिब्रिटी हेयर आर्टिस्ट मार्से पेड्रोजो याचं निधन झालं. मार्से हा केवळ मित्र नव्हता, आयुष्यातील अनेक सुख दुःखामध्ये साथ दिल्याचे नोराने सांगितले. नोरा फतेही हिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं आहे.

नोरो फतेही हिने सांगितलं की, मार्से पेड्रोजो याचा स्वभाव खूप चांगला होता. त्याच्या आठवणी स्मरणीय असतील'. खास मित्राच्या निधनाने नोरा दु:खात बुडाली आहे. मार्से याच्या निधनाने फक्त नोरा फतेहीचे नुकसान झालं नाही. तर मनोरंजन सृष्टीला धक्का बसला आहे.नोरा हिने इन्स्टाग्राम पोस्टमधून मार्से याच्या जुन्या आवठणींना उजाळा दिला आहे. मार्सेच्या जाण्याने तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं नुकसान झाल्याची भावना नोराने व्यक्त केल्या आहे.

marce pedrozo death
Train Viral Video: वर्दीला सलाम! रेल्वे जवानांनी धक्का देत चक्क बंद ट्रेन केली सुरू; VIDEO पाहून चक्रावून जाल

नोरो फतेही हिने म्हटलं आहे की, 'मी आज माझ्या चांगल्या मित्राला गमावलं आहे. मी चांगला विश्वासू मित्र गमावला आहे. त्याने माझ्या आयुष्यातील खडतर परिस्थितीत साथ दिली. त्याच्या जाण्याने मा‍झ्या वैयक्तिक आयुष्यात नुकसान झालं आहे. मी त्याच्या मृत्यूचं वास्तव स्वीकारण्याचं प्रयत्न करत आहे'. नोराने पोस्ट करताना रडण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत.

marce pedrozo death
Train Viral Video: बाळाला घट्ट मिठी मारून आईचा मृत्यूच्या वाटेवर प्रवास; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

मार्से हा फक्त नोराचा नव्हे, जान्हवी कपूर, जॅकलीन फर्नांडीज, खुशी कपूर, तृप्ती डिमरी, मलायका अरोडा, शरवरी वाघ आणि सुहाना खानच्या केसाचीही त्याने हेयर स्टायलिंग केली आहे. त्याचे इन्स्टाग्राम ५३ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. मनोरंजन सृष्टीत त्याच्या कामाचं नेहमी कौतुक व्हायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com