Who is Nathan Anderson?
Who is Nathan Anderson? SAAM TV
देश विदेश

Who is Nathan Anderson? : कोण आहेत नॅथन अँडरसन? ज्यांच्या एका रिपोर्टने गडगडले आदानींचे सामाज्र

Chandrakant Jagtap

Hindenburg Report : अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सलग सातव्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. ताज्या आकडेवारीनुसार गौतम अदानी जगातील टॉप-20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी 3 फेब्रुवारीलाही कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत. गेल्या 5 दिवसांत अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले आहेत.

अमेरिकेतील इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म 'हिंडेनबर्ग'च्या रिपोर्टनंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तेव्हापासून अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरचे मूल्य जवळपास 60 टक्क्यांनी घसरले आहे.

नॅथन अँडरसन यांच्या रिपोर्टचा परिणाम

'हिंडेनबर्ग'चा एक रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी ग्रुपला हा मोठा धक्का बसला आहे. नॅथन अँडरसन हे याच 'हिंडेनबर्ग' संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनीच अधानी समूहावरील हा रिपोर्ट तयार केला आहे. हा रिपोर्ट तयार करण्यासाठी त्यांनी दोन वर्ष मेहनत घेतल्याचा दावा केला आहे.

या रिपोर्टमध्ये अदानी समूहाच्या सर्व ७ मोठ्या लिस्टेड कंपन्यांवर प्रचंड कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. आदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स 85 टक्क्यांहून अधिक ओव्हरव्हॅल्यूड असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अदानी समूहाने शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंगमध्ये गैरव्यवहार केल्याचा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

कोण आहेत नॅथन अँडरसन?

नॅथन अँडरसन हे अमेरिकेतील इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म 'हिंडेनबर्ग' कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी त्यांचे शिक्षण अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठातून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नॅथन अँडरसन यांनी एका डेटा रिसर्च कंपनीत नोकरी केली. या कंपनीत त्यांना पैशाच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्याचे काम दिले गेले. येथे काम करत असताना त्यांना डेटा आणि शेअर मार्केटमध्ये अनेक खाचखळगे समजले. शेअर बाजार हा जगातील श्रीमंतांचा सर्वात मोठा आधार असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर नॅथन अँडरसन यांनी आणखी संशोधन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, शेअर बाजारात असे काहीतरी चालू आहे जे सामान्य लोकांना माहित नाही आणि हे मार्केट केवळ भांडवलदारांचे आहे. यावरुन नॅथन अँडरसन यांना फायनांशियल रिसर्च कंपनीची कल्पना सुचली आणि 2017 मध्ये नॅथन अँडरसनने आपली नवीन कंपनी 'हिंडेनबर्ग' सुरू केली. या कंपनीच्या स्थापनेनंतर नॅथन अँडरसन यांनी जगातील अनेक भांडवलदारांचा पर्दाफाश केला. यामुळे गुंतवणूकदारांचा देखील 'हिंडेनबर्ग'वर विश्वास बसला.

काय संशोधन करते 'हिंडेनबर्ग' संस्था?

नॅथन अँडरसन यांची 'हिंडेनबर्ग' ही कंपनी शेअर बाजार, इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जवर संशोधन करते. कंपनी आपल्या संशोधनात शेअर मार्केटमध्ये पैशांची हेराफेरी होत आहे का? बड्या कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी अकाउंटिंगमध्ये फेरफार करत आहेत का आणि कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी शेअर मार्केटचा गैरवापर करत आहे का याचा अभ्यास करते. असे सर्व बाजूंनी संशोधन केल्यानंतरच 'हिंडेनबर्ग' कंपनी आपला अहवाल प्रसिद्ध करते. अदानी समुहावरील 'हिंडेनबर्ग'च्या रिपोर्टचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : नोकरीत मराठी माणूस नको! का? संताप-राग-खंत... मराठी तरूणांच्या भावना आल्या उफाळून

SCROLL FOR NEXT