Nashik News : हृदयद्रावक! पित्याच्या डोळ्यांदेखत १४ महिन्यांच्या चिमुकलीवर काळाचा घाला

Nashik Little Girl Killed In Accident: आयजाने कामाहून परतत असलेल्या पित्याल्या पाहिले आणि आनंदाच्या भरात त्यांना भेटण्यासाठी घराबाहेर पडली.
Nashik Little Girl Killed In Accident
Nashik Little Girl Killed In AccidentSAAM TV

>>तबरेज शेख

Nashik Road Accident : घरी येत असलेल्या पित्याला पाहून आनंदाच्या भरात त्यांच्याकडे जाताना १४ महिन्यांच्या चिमुकलीवर काळाने घाला घातला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी नाशिकमध्ये घडली. आयजा खान असे मृत मुलीचे नाव आहे. आयजाने कामाहून परतत असलेल्या पित्याल्या पाहिले आणि आनंदाच्या भरात त्यांना भेटण्यासाठी घराबाहेर पडली. हाच क्षण तिच्यासाठी अंतिम ठरला.

घराबाहेरून जाणाऱ्या एका कारने आयजाला धडक दिली. तिच्या पित्याच्या डोळ्यांदेखत हा अपघात झाला. मन हेलवणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमजद अखतार खान हे पंधरा दिवसांपूर्वी नाशिकमध्ये त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी नातलगांच्या घरी आले होते.

Nashik Little Girl Killed In Accident
Pune News : शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

आर्थिक गणित जुळवण्यासाठी नाशिकमधील एका खाजगी कंपनीत ते कामाला जात होते. बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अमजद खान कामावरून घरी परतले. तेव्हा १४ महिन्यांची त्यांची मुलगी आयजा खान हिने त्यांना पाहिले. वडिलांना पाहिल्यानंतर ती आनंदाने धावत त्यांच्याकडे जाऊ लागली. ती घराबाहेर पडताच काळाने तिच्यावर झडप घातली.

तिथेच शेजारी राहणाऱ्या हसनन मुजम्मिल खान यांच्या कारची रस्ता ओलांडून वडिलांकडे जाणाऱ्या आयजाला धडक बसली. काही कळण्याआधीच ती कारच्या चाकाखाली आली. हा प्रसंग हसनेन खान यांच्या लक्षात न आल्याने ते वाहन घेऊन निघून गेले.

Nashik Little Girl Killed In Accident
Amul Milk Hike: महागाईचा आणखी एक झटका! अमूल दुधाच्या किमतीत वाढ

आयजा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिला तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वाहन चालक हसनेन खान यांच्या विरोधात वडील अमजद खान यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित वाहनचालक हसनेन खान यांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com