Explainer : अपक्ष उमेदवार, तीन मोठे पक्ष विरोधात; तरीही सत्यजित तांबेनी विजयी पताका फडकवलीच... पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Satyajeet Tambe Wins Election: तीन मोठे पक्ष विरोधात असताना सत्यजित तांबे यांनी विजयी पताका कशी फडकावली हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSaam Tv
Published On

Satyajeet Tambe Win Reasons: नाशिक पदवीधर निवडणुकीत सुरुवातीपासून ट्विस्ट पाहायला मिळत होते. सत्यजित तांबे आणि कुटुंबिय या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिले. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेतली आणि सत्यजीत तांबे  यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर पक्ष शिस्तभंग प्रकरणी निलंबनाची कारवाई केली.

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील. महाविकास आघाडीने सत्यजित तांबे यांच्याविरोधात शुभांगी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. सत्यजित तांबे हे भाजपकडे पाठिंबा मागतील असं वाटतं होतं मात्र शेवटपर्यंत तसं काही झालं नाही.

मात्र भाजपने सत्यजित यांना छुपा पाठिंबा दिला हे आता सर्वांना कळून चुकलंय. तरीदेखील तीन मोठे पक्ष विरोधात असताना सत्यजित तांबे यांनी विजयी पताका कशी फडकावली हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सत्यजित तांबे यांचा विजय सोपा करण्यात कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरल्या यावर एक नजर टाकुयात. (Maharashtra Political News)

Satyajeet Tambe
Nashik Election: सत्यजित तांबेनी बाजी मारली; विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं...

सत्यजित तांबे यांच्या विजयाची कारणं

>> सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी मागील १३ वर्षात मतदारसंघात मतदारांची नोंदणी आणि फौज उभी केली. त्याचा फायदा सत्यजित यांना झाला.

>> डॉ. सुधीर तांबे यांचे मतदारसंघात सर्वपक्षीय पातळीवर असलेले वैयक्तिक आणि मैत्रीचे संबंध कामी आले.

>> काँग्रेसने कारवाई केली असली तरी सर्वपक्षीय मैत्री संबंधांमुळे सत्यजित तांबे यांना स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त्यांनी बरीच मदत केली.

>> भाजपनेही मदत केल्याने त्याचाही फायदा सत्यजित तांबे यांना झाला आहे.

>> आरोप आणि टीका होत असतांनाही प्रत्युत्तर न देता शेवटपर्यंत आपण काँग्रेसचेच असून अपक्षच निवडणूक लढवत असल्याचं पटवून देण्यात तांबे यशस्वी ठरले.

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Car: सत्यजित तांबेचा 'कार'नामा, संपूर्ण निवडणुकीदरम्यान वापरलेल्या कारची जोरदार चर्चा

>> माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघटना, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, टीडीएफसह अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना आणि शिक्षण संस्थांनी पाठिंबा दिल्याने विजय सोपा झाला.

>> याउलट महाविकास आघाडीच्या पुरस्कृत असूनही महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त्यांनी शुभांगी पाटील यांना मदत न केल्यानं त्याचाही फायदा झाला सत्यजित तांबे यांनाच झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com