Satyajeet Tambe Car: सत्यजित तांबेचा 'कार'नामा, संपूर्ण निवडणुकीदरम्यान वापरलेल्या कारची जोरदार चर्चा

Satyajeet Tambe Wins Election: सत्यजीत तांबे MH 17 BX 567 या क्रमांकाच्या कारवर उभे राहून जल्लोष करताना दिसले.
Satyajeet Tambe Car
Satyajeet Tambe CarSaam TV

Nashik Graduate Constituency Election Result: नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांच्या कारची चर्चा सुरु झाली आहे. सत्यजीत तांबे ज्या कारमधून आले त्या कारवर सर्वांची नजर गेली. कारण ती कार उपस्थित अनेकांच्या ओळखीची होती. ती कार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे कुटुबियांनी निवडणूक लढवण्यासाठी घेतलेल्या भूमिकेवरुन काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर दिसला. पक्षाने डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे या दोघांवरही पक्ष शिस्तभंग केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली. बाळासाहेब थोरात यांनी देखील या निवडणुकीत स्वत:ला दूर ठेवलं. मात्र आता त्यांची कार सत्यजित तांबे यांच्याकडे दिसल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. (Maharashtra Political News)

Satyajeet Tambe Car
Nashik Election: सत्यजित तांबेनी बाजी मारली; विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं...

सत्यजीत तांबे MH 17 BX 567 या क्रमांकाच्या कारवर उभे राहून जल्लोष करताना दिसले. याच कारचा वापर करत त्यांनी या निवडणुकीत प्रचार केला आणि विजय मिळवला आहे.अहमदनगर, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकांसाठी ही कार चांगलीच ओळखीची आहे.

Satyajeet Tambe Car
Nashik MLC Result : नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का; सत्यजित तांबेंचा विजय, शुभांगी पाटील पराभूत

सत्यजीत तांबे यांनी देखील आपले मामा बाळासाहेब थोरात यांची कार संपूर्ण प्रचारादरम्यान वापरली. याचा अर्थ सत्यजित तांबेंना मतदारांना, काँग्रेस कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना जो संदेश द्यायचा होता तो देण्यात ते यशस्वी ठरले. मात्र सत्यजित तांबेचा हाच 'कार'नामा सध्या चर्चेचा विषय आहे.

सत्यजित तांबे यांनी एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. तांबेंचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी पराभव झाला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com