Myanmar-Thailand Earthquake Saam Tv News
देश विदेश

Myanmar-Thailand Earthquake: शक्तिशाली भूकंपाने म्यानमार-थायलंडमध्ये हाहाकार; ६९४ जणांचा मृत्यू तर १६०० जखमी; आणीबाणी जाहीर

Myanmar-Thailand : भूकंपाच्या धक्क्यांनी म्यानमार आणि थायलंड हे दोन्ही देश उद्ध्वस्त झाले आहेत. याठिकाणी रस्त्यांना मोठ-मोठ्या भेगा, इमारती- पूल कोसळलेत. भूकंपामुळे आतापर्यंत ७०० जणांचा मृत्यू झाला.

Priya More

म्यानमार आणि थायलंड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले असून मृतांचा आखडा वाढतच चालला आहे. भूकंपाच्या धक्क्यांनंतर म्यानमारमध्ये इमारती कोसळल्या, पूल पडले आणि रस्ते खचले. यामुळे आतापर्यंत ७०० नागरिकांचा मृत्यू झाला. तर १६७० जण झखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. म्यानमारमध्ये एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के बसले. पहिला भूकंपाचा धक्का ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणने (USGS) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप १० किलोमीटर खोलीवर झाला आणि त्यानंतर ६.४ तीव्रतेचा शक्तिशाली आफ्टरशॉक आला. भूकंपाचे केंद्र मंडाले शहरापासून सुमारे १७.२ किलोमीटर अंतरावर होते. भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंडने आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. चिनी वृत्तसंस्था शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, म्यानमारच्या सीमेवरील नैऋत्य युनान प्रांतातही जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. पण तिथून कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही.

भूकंपाच्या धक्क्यामुळे थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये अनेक उंच इमारती कोसळल्या. बांधकाम सुरू असलेली ३० मजली इमारत कोसळून यामध्येही ३ जणांचा मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे, म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाचे धक्के थायलंड, बांगलादेश, भारत, लाओस आणि चीन या ५ शेजारील देशांमध्येही जाणवले. भारतातील पश्चिम बंगाल आणि मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. ७.३ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर बांगलादेशमध्येही सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले.

सध्या थायलंयमधील परिस्थिती खूपच गंभीर आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्यानमार सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे प्रभावित झालेल्या भागात रक्तदानाची मोठी गरज आहे. संयुक्त राष्ट्रांनी तात्काळ मदत कार्यासाठी ५ दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली. दोन्ही देशांमधील रुग्णालयांमध्ये जखमींची संख्या सतत वाढत आहे.

म्यानमारमध्ये १६७० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तर थायलंडमध्येही १०० पेक्षा अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात डॉक्टरांना अडचणी येत आहेत. स्थानिक लोक आणि स्वयंसेवी संस्था रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत परंतु पुरवठा अजूनही गरजेपेक्षा कमी आहे. म्यानमार आणि थायलंड या दोन्ही देशाच्या मदतीला भारत देश धावून गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT