
म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकॉक भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी हादरले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, रिक्टर स्केलवर याची तीव्रता ७.७ नोंदवली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्हीही देशांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. म्यानमारमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जाते. या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये किती वित्त आणि जीवितहानी झाली आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
भूकंपाच्या तीव्र झटक्यांमुळं बँकॉक आणि म्यानमारच्या काही शहरांमधील मोठमोठ्या इमारती थरारल्या. भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.७ इतकी नोंदवली गेली. भूकंपावेळी उद्भवलेल्या परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भयभीत झालेले लोक रस्त्यावर आरडाओरड करत सैरावैरा पळताना या व्हिडिओमध्ये दिसते.
भूकंपामुळं बँकॉकमधील एक गगनचुंबी इमारत कोसळल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार, या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. भूकंपाचे हादरे बसल्याने ती कोसळली. बँकॉकमधील अशा घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या दक्षिणेकडील सागाइंगजवळ होता. भूविज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारच्या वेळेस झालेला भूकंप १० किलोमीटर खोलवर होता. त्यामुळेच भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.७ इतकी नोंदवली गेली. या भूकंपाच्या दोन तास आधीही दोन्ही देशांमध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवले होते.
म्यानमारमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले असून, त्याचे हादरे भारतातील अनेक राज्यांत बसले. कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत भूकंपाचे सौम्य झटके बसले. विशेषतः मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आदी ठिकाणी जोरदार हादरे जाणवले. दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात सौम्य हादरे जाणवले. नोएडा आणि गाझियाबादमध्ये जमीन थरथरू लागल्याने लोक घराबाहेर आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.