Chalisgaon Earthquake : भूकंप आला रे भो! चाळीसगावात गूढ आवाजाने खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Chalisgaon Taluka Earthquake Tremors Felt : अनेकांनी हा भूकंप असल्याचा अंदाज लावून प्रशासनाला माहिती दिली. मात्र, जिल्हा प्रशासनाने भूकंपाची कोणताही नोंद नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
Earthquake tremors in Chalisgaon taluka
Earthquake tremors in Chalisgaon talukaSaam Tv News
Published On

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका आज सायंकाळी अचानक दोन वेळा मोठ्या आवाजाने हादरलं. या आवाजासोबत नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांनी हा भूकंप असल्याचा अंदाज लावून प्रशासनाला माहिती दिली. मात्र, जिल्हा प्रशासनाने भूकंपाची कोणताही नोंद नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

चाळीसगाव तालुक्यात सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास हा आवाज शहरासह ग्रामीण भागात ऐकू आला. काही सेकंदाच्या अंतराने दुसऱ्यांदा तोच आवाज पुन्हा ऐकू आला आणि त्यासोबत हलकासा भूचालसदृश कंपनही जाणवले. यामुळे घबराट उडालेल्या नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. काहींनी हा आवाज मोठ्या स्फोटासारखा असल्याचं सांगितले. तर काहींनी तो आकाशात घडलेल्या घटनेशी संबंधित असावा, असा अंदाज व्यक्त केला.

Earthquake tremors in Chalisgaon taluka
मुलाला काही झालं तर आम्ही आत्महत्या करु, लेकाची मृत्यूशी झुंज, आई-बापाचा आक्रोश, प्रेम संबंधातून पोराला मारहाण

चाळीसगाव तालुक्यात या गूढ आवाजाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अचानक मोठा आवाज झाला आणि काही सेकंदांसाठी जमिनीला कंपन जाणवलं. आम्ही लगेच घराबाहेर पडलो. हा स्फोटासारखा आवाज नक्की कशामुळे झाला याबद्दल चर्चांना ऊत आलाय. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

Earthquake tremors in Chalisgaon taluka
Pune Swargate ST Depot Case : दत्ता गाडेचा मोठा पराक्रम, CID कडून ३ कलमांची वाढ; गुन्हे ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com