Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Fact Check: महाभारतातले पुरावे सापडलेय...होय, महाभारतातील रथ उत्खनन करताना सापडल्याचा व्हिडिओ समोर आलाय...मोठ्या क्रेनने रथ बाहेर काढण्यात आलाय असा दावा केलाय...पण, खरंच महाभारतातले पुरावे सापडले का...? याची आम्ही पडताळणी केली...
A viral video claims discovery of a Mahabharat-era chariot in Kurukshetra — investigation reveals it’s AI-generated.
A viral video claims discovery of a Mahabharat-era chariot in Kurukshetra — investigation reveals it’s AI-generated.Saam Tv
Published On

...कुरुक्षेत्रातील उत्खननात महाभारताच्या काळातील रथ आणि महाकाय गदा सापडलीय, असा दावा करण्यात आलाय...महाभारत काळातील धनुष्य आणि बाण, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सापडली असून, ती बाहेर काढतानाचा व्हिडिओ समोर आलाय...पण, खरंच या व्हिडिओत दिसतंय ते खरं आहे का...?

हा व्हिडिओ आता नीट पाहा...कुरुक्षेत्र म्हणजे

महाभारतातील युद्धभूमी असलेलं हे ठिकाण...याच ठिकाणी उत्खनन करताना महाभारताच्या काळातील रथ, महाकाय गदा, धनुष्य आणि बाण, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सापडलीय असा दावा केलाय...या व्हिडिओतही रथ बाहेर काढताना दाखवण्यात आलंय...भली मोठी गदा, ज्या रथात बसून कृष्ण आणि अर्जुनाने धर्मयुद्धाचा इतिहास रचला तो रथही सापडल्याचा दावा करण्यात आलाय...पण, व्हिडिओत दिसतंय ते खरं आहे का...? खरंच कुरुक्षेत्रात उत्खननात महाभारतातले पुरावे हाती लागलेयत का...? या व्हिडिओची सत्यता करण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत माहिती मिळवण्यासाठी थेट आम्ही कुरुक्षेत्रमध्ये असं काय सापडलंय का...? हे तपासून पाहिलं...मात्र, कोणत्याही पेपरमध्ये किंवा कुठेही अशी बातमी सापडलेली नाही...तर आम्ही याविषयाच्या अभ्यासकांशीही चर्चा केली...

कुरुक्षेत्रात महाभारतातील पुरावे सापडलेले नाही

कुरुक्षेत्रात सध्या उत्खनन केलेलं नाही

AIच्या माध्यमातून व्हिडिओ बनवलाय

दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने असा कोणताही शोध जाहीर केलेला नाही...त्यामुळे आता उत्खनन करताना महाभारतातील पुरावे सापडले हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...असे व्हिडिओ व्हायरल होत करून दिशाभूल केली जातेय...AIचा वापर चांगल्यासाठी केला जातो, तसाच गैरवापरही केला जातोय...त्यामुळे तुम्ही अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com