Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राज्यातील राजकीय घडामोडी, बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

ईश्वरपूरकरांकडून सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात जंगी स्वागत

सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांनाने सांगलीच्या इस्लामपूरचे ईश्वरपूर झाले. त्यामुळे मित्र पक्ष व रयत क्रांती संघटनेच्या वतीने फटाके, पेढे, वाद्यांच्या गजरात, फुलांची उधळण करत आ. सदाभाऊ खोत यांचे ईश्वरपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ईश्वरपूर असा पहिला उल्लेख एका जाहीर सभेत केल्यानंतर या नामांतराच्या मागणीला वेग आला होता. नगरपालिकेच्या सभागृहातही “इस्लामपूरचे ईश्वरपूर” असे नामांतर करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर झाला होता. पावसाळी अधिवेशनात आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत ही मागणी मांडली होती. आमदार गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत देवाभाऊंच्या सरकारने ती मागणी आज मान्य केली आहे. यावेळी रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून “ईश्वरपूर” या नव्या नावाचा उत्सव साजरा केला.

Maharashtra Live News Update: - नाशिकमध्ये थंडीची चाहूल, नाशिककरांनी आज अनुभवली धुक्याची चादर

- शहरातल्या अनेक भागात सकाळच्या सुमारास पडले दाट धुके

- वातावरणातील बदलामुळे नाशिक हरवलं धुक्यात

- मागील ६ महिन्यांच्या पावसानंतर शहरातील वातावरण बदलले

- तापमानाचा पार २२ अंशांवरून थेट १८ अंशांपर्यंत घसरला

- मागील ३ दिवसांत तापमानात ४ अंशांची घट

- येत्या काही दिवसांत थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता

अकोल्यात भीषण अपघात, दोन ट्रकची जोरदार धडक

अकोला मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झालाय.. काल रात्री उशिरा अकोल्यापासून 15 किमी अंतरावर असलेल्या व्याळा गावाजवळ हा अपघात झाला. दोन ट्रकमध्ये अपघात होऊन 2 जण गंभीर झालेये.. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, खामगावकडून अकोल्याकडे येणाऱ्या ट्रक चालकाच वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट ट्रक डिव्हायडर तोडून अकोल्याहून खामगावकडे जाणाऱ्या ट्रकला धडकला.. स्थानिकांनी तातडीने वाहन चालक आणि क्लिनरला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं. मात्र अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती.

जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील सातवा आरोपी अटकेत

जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील सातव्या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीय. बाळू लिंबाजी सानप असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळा करून बाळू सानप हा आरोपी फरार झाला होता. सदरील आरोपी बीड येथील त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीवरून पोलीस पथकाने सदरील आरोपीस बीड येथून अटक केली. त्यानंतर त्यास जालना येथे आणून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घोटाळा प्रकरणी आतापर्यंत एकूण 7 आरोपींना जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

 उत्तरेकडे थंड हवा,  जळगाव शहरात धुके

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत होत असून, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थंड हवा दक्षिणेकडे सरकत आहे

MUMBAI | एसटी महामंडळ विकणार पेट्रोल

राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या वतीने उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने पेट्रोलची किरकोळ विक्री सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महामुंबईत ११, तर राज्यभरात एकूण २५० ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेलबरोबरच सीएनजी व इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असलेले रिटेल विक्री पंप सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

MUKTAINAGAR | संभाजीनगर-इंदोर महामार्गावर भीषण अपघात

संभाजीनगर-इंदोर महामार्गावर मुक्ताईनगरजवळ मध्यरात्री प्रवासी ट्रॅव्हल्स बस आणि टँकर यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. आकोटहून इंदोरकडे जाणारी ही बस होती. या अपघातात एक व्यक्ती जागीच ठार झाली, तर एका गंभीरसह एकूण सात जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

NAGPUR | नागपूरजवळ तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी तलावात दुर्दैवी घटना घडली. नागपूरचा रहिवासी अविनाश आनंद (२२) आणि चंद्रपूरचा रहिवासी संकल्प मालवे (१९) या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. हे दोघे आपल्या सहा मित्रांसह तलावाजवळ फिरायला गेले होते. अविनाश पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता, तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र संकल्प मालवे यानेही तलावात उडी घेतली. मात्र, पाण्याचा खोलपणा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. अविनाश बी.ई. तृतीय वर्षाचा, तर संकल्प बारावीचा विद्यार्थी होता.

PUNE | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची आज पार पडणार पुण्यात बैठक होणार आहे. पुण्यातील पद्धाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे साधणार संवाद आणि मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची आज बैठक

PUNE | पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरण

अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी. बाजीराव रस्त्यावर घडलेल्या १७ वर्षीय तरुणाच्या खूनप्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी. मयांक सोमदत्त खरारे (वय १७) या तरुणाचा मंगळवारी दुपारी खून करण्यात आला. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तीन अल्पवयीन आरोपींविरुद् गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. त्यावर बाल न्याय मंडळाने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com