Myanmar BombBlast Saam Tv
देश विदेश

Myanmar: म्यानमारमध्ये बौद्ध उत्सवाला लक्ष्य, पॅराग्लायडरद्वारे बॉम्ब टाकले; २४ जणांचा मृत्यू

Myanmar Bomb Blast: म्यानमारमध्ये बौद्ध उत्सवादरम्यान बॉम्ब टाकण्यात आले. पॅराग्लायडरच्या माध्यमातून हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये २४ जणांचा मृत्यू तर ४७ जण जखमी झाले आहेत.

Priya More

भारताच्या शेजारी असणाऱ्या म्यानमारमध्ये सैन्यांकडून सगाइंग क्षेत्रातील एका गावामध्ये पॅराग्लायडरच्या माध्यमातून हवाई हल्ला करण्यात आला. बौद्ध उत्सवादरम्यान त्यांच्याकडून दोन बॉम्ब हल्ले करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी चाऊंग यू टाऊनशिपमध्ये म्यानमारचा बौद्ध उत्सव साजरा केला जात होता. या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्याचवेळी पॅराग्लायडरकडून दोन बॉम्ब टाकण्यात आले. या बॉम्बस्फोटामध्ये आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला तर ४७ जण जखमी झाले आहेत.

म्यानमारमधील एका गावात बौद्ध उत्सव साजरा केला जात होता. यावेळी म्यानमारच्या लष्करी सरकारने ताब्यात घेतलेल्या राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी करत रॅली काढण्यात आली होती. यावेळी गर्दीला लक्ष्य करत बॉम्बस्फोट करण्यात आले. पॅराग्लायडरने साडेसात वाजताच्या सुमारास दोन बॉम्ब टाकले. एका गावकऱ्याने सांगितले की, हल्ला अचानक करण्यात आला त्यामुळे गावातील नागरिकांना पळण्यासाठी वेळ मिळाला नाही.

बीबीसीने जंटाविरोधी पीपल्स डिफेन्स फोर्सच्या एका स्थानिक अधिकाऱ्याचा हवाला देत दिलेल्या वृत्तात सांगितले की, सोमवारी चौंग यू टाउनशिपमध्ये जवळपास १०० जण बौद्ध धर्मात रुजलेल्या थाडिंग्युट सण साजरा करण्यासाठी जमले होते. तेव्हा ही बॉम्बस्फोटाची घटना घडली . एका पॅराग्लायडरने गर्दीवर लक्ष्य करत दोन बॉम्ब टाकले. बॉम्बस्फोट होताच मोठा गोंधळ उडाला आणि सर्वजण इकडे तिकडे पळू लागले.

पीपल्स डिफेन्स फोर्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जुंटा धोरणांविरुद्धचे निदर्शने मोडून काढण्यासाठी हे बॉम्बस्फोट करण्यात आले. या ठिकाणी हल्लाहोण्याची माहिती मिळताच आमच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. पण पॅरामोटर्स अपेक्षेपेक्षा लवकर उत्सवाच्या ठिकाणी पोहोचले. पॅराग्लायडर आले आणि अवघ्या सात मिनिटांत बॉम्ब टाकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

Maharashtra FDA: राज्यात बिना प्रिस्क्रिप्शन औषध विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई, ८८ जणांवर मोठी कारवाई

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Ayodhya Blast News : सिलिंडरच्या स्फोटानंतर घर कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, श्रीरामांच्या नगरीत खळबळ

SCROLL FOR NEXT