मिझोराममध्ये विधानसभेच्या ४० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत झोरम पीपल्स मुव्हमेंट (ZPM) पक्षाला बहुमत मिळालं आहे. हाती आलेल्या निकालानुसार, ZPM ला २७ जागांवर विजय मिळवलाय. तर MNFला ९ जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे तीन राज्यात सपाटून पराभव मिळालेल्या काँग्रेसला येथे धक्का बसलाय. मिझोराममध्येही भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला मागे सोडलंय. (Latest News)
येथेही एक्झिट पोलपेक्षा वेगळे निकाल लागले आहेत. एक्झिट पोलमध्ये मिझोराम फ्रंटला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मिझोराम येथे ११ लाख इतकी लोकसंख्या आहे तर ८.५२ लाख मतदार असून यात ४.१३ लाख पुरूष आणि ४.३९ महिला मतदारांचा समावेश आहे.
दरम्यान येथे सत्ता स्थापन करण्यास २० जागा जिंकण्याची गरज असते. तर झोरम पीपल्स मुव्हमेंट पक्षाने २७ जागा जिंकल्या आहेत. येथे काँग्रेसने एक जागा जिंकली आहे तर भाजपने २ जिंकल्या आहेत. ZPM पक्षाच्या लाटेसमोर MNP मिझो नॅशनल फ्रंटचे नेते आणि मुख्यमंत्री जोरमथंमा यांचाही पराभव झाला. आयझोल या मतदारसंघात ZPM चे उमेदवार लालथानसांगा यांनी जोरमथंमा यांचा पराभव केला. मुख्यमंत्री जोरमथंमा हे संध्याकाळी राज्यपाल हरी बाबू कंभामपती यांची भेट घेत त्यांच्याकडे ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.