Famous Actress Wedding : मालिकेच्या सेटवर सुरू झाली लव्ह स्टोरी, ४ वर्ष केलं डेट; प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्न बंधनात, पाहा VIDEO

Aetashaa Sansgiri- Nishad Bhoir Wedding : प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री लग्न बंधनात अडकली आहे. ती चार वर्ष एका अभिनेत्याला डेट करत होती. मालिकेच्या सेटवर त्यांची जोडी जमली.
Aetashaa Sansgiri- Nishad Bhoir Wedding
Famous Actress Weddingsaam tv
Published On
Summary

मनोरंजनसृष्टीत लगीन घाई पाहायला मिळत आहे.

प्रसिद्ध मराठी टिव्ही अभिनेत्री एतशा संझगिरी लग्न बंधनात अडकली.

एतशाने एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

सध्या मनोरंजनसृष्टीत लगीन घाई पाहायला मिळते आहे. प्रेक्षकांचे आवडते कलाकार लग्न बंधनात अडकले आहेत. रेवती लेलेनंतर आता अजून टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री लग्न बंधनात अडकली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील नवीन सुरू झालेल्या 'तुझ्या सोबतीने' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री एतशा संझगिरी लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री एतशा संझगिरीने अभिनेता निषाद भोईरसोबत लग्नगाठ बांधली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये एतशा संझगिरी आणि निषाद भोईर यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. 22 फेब्रुवारीला दोघांनी सप्तपदी घेतले आहे. त्यांच्या लग्न सोहळ्याचे खास व्हिडीओ 'राजश्री मराठी' यांनी शेअर केले आहेत. दोघांनी लग्नात पारंपरिक लूक केला होता. दोघे खूपच सुंदर दिसत होते. सध्या एतशा संझगिरी आणि निषाद भोईरला चाहते, कलाकारमंडळी शुभेच्छा देताना दिसत आहे. तसेच त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

एतशा-निषाद यांची लव्ह स्टोरी

एतशा-निषाद यांची जोडी मालिकेच्या सेटवर जुळली. एतशा-निषाद हे पहिल्यांदा 'दख्खनचा राजा जोतिबा' मालिकेत एकत्र दिसले. त्यांची मालिकेच्या सेटवर पहिली भेट झाली. या मालिकेचे शूटिंग कोल्हापूरमध्ये सुरू होते. मालिकेदरम्यान दोघांची छान मैत्री झाली. त्यानंतर एका ट्रिपमध्ये निषादने एतशासमोर आपले प्रेम व्यक्त केले आणि दोघांच्या नात्याला सुरूवात झाली. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यावर आता एतशा-निषाद लग्न बंधनात अडकले आहेत.

वर्कफ्रंट

'पुण्यश्लोक अहिल्याबाई' मालिकेतून एतशा घराघरात पोहोचली. एतशा संझगिरीच्या 'छोटी मालकीण', 'राजा राणीची गं जोडी', 'दख्खनचा राजा जोतिबा' आणि 'निवेदिता माझी ताई' या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या एतशा 'तुझ्या सोबतीने' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. एतशा संझगिरीचा नवरा निषाद भोईर एक उत्तम कलाकार आहे. तो अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये झळकला आहे. अलिकडेच त्याचे 'पुरुष' नाटक आले आहे. निषादने 'सावळ्याची जणू सावली', 'आई – मायेचं कवच', 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या गाजलेल्या मालिका केल्या आहेत. तसेच एतशा आणि निषादने 'निवेदिता माझी ताई' आणि 'दख्खनचा राजा जोतिबा' या मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे.

Aetashaa Sansgiri- Nishad Bhoir Wedding
Bigg Boss Marathi 6 : खानदेशच्या किंगची बिग बॉसच्या घरातून Exit, सचिन कुमावतच्या शॉकिंग एलिमिनेशनमुळे चाहते नाराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com