Shreya Maskar
मराठी मनोरंजन सृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री एतशा संझगिरीचा थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे.
एतशा संझगिरीने बॉयफ्रेंड आणि अभिनेता निषाद भोईरसोबत साखरपुडा केला असून दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.
'पुण्यश्लोक अहिल्याबाई' मालिकेतून एतशा घराघरात पोहोचली.
एतशा आणि निषाद यांच्या साखरपुड्याला कलाकार मित्रमंडळींनी हजेरी लावली.
सध्या एतशा आणि निषादवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
एतशाने जांभळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती. तर निषादने निळ्या आणि जांभळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
निषाद भोईर अलिकडेच 'पुरुष' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
एतशा संझगिरीच्या छोटी मालकीण, राजा राणीची गं जोडी या मालिका देखील गाजल्या आहेत.