Manasvi Choudhary
लग्नात प्रत्येक नवरीला आपण सुंदर दिसावे असे वाटते मात्र लग्नाची तयारी, सततची धावपळ यामुळे चेहरा थकून जाते.
केवळ पार्लरमध्ये जाऊन नवरीच्या चेहऱ्यावर ग्लो येणार नाही तर तुम्ही घरगुती सोप्या टिप्स फॉलो करणं आवश्यक आहे.
दिवसातून दोनदा फेसवाॅशने चेहरा स्वच्छ करा. तुमची त्वचा तेलकट असली तरीही मॉइश्चरायझर नक्की लावा, यामुळे त्वचा मऊ राहते.
दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचा आतून चमकते. रोज सकाळी एक नारळ पाणी प्या
बेसन, चिमूटभर हळद, चंदन पावडर आणि थोडे दूध एकत्र करून फेस पॅक बनवा. हा पॅक आठवड्यातून दोनदा लावा.
कितीही काम असले तरी रात्री किमान ७-८ तास शांत झोप घ्या. झोप पूर्ण झाली की डोळ्यांखालील सूज, डार्क सर्कल्स येत नाही.
लग्नाच्या १५-२० दिवस आधी कोणतेही नवीन सौंदर्य प्रसाधन, क्रीम किंवा फेसवाॅश वापरू नका. लग्नाच्या अगदी २ दिवस आधी फेशियल किंवा वॅक्सिंग करणे टाळा
लग्नाच्या काही दिवस आधीपासून जर तुम्ही या ५ खास स्किनकेअर टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक नक्कीच येईल