Manasvi Choudhary
सकाळची सुरूवात जर तुम्ही योग्य पेयाने केली तर संपूर्ण दिवस शरीरात उर्जा टिकून राहते.
सकाळी केवळ चहा- कॉफीच नाही तर तुम्ही हेल्दी ड्रिंक्स प्यायली पाहिजे.
लिंबू आणि मध पाणी हे शरीरासाठी अत्यंत पोष्टिक पेय आहे. जे शरीरातील विषारी घटक बाहेर काढते तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
सकाळी जर तुम्हाला आळस येत असेल तर तुम्ही जिरे धणे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून गाळून प्या यामु पचनक्रिया सुधारते तसेच शरीरातील उष्णता कमी होते.
सफरचंद, बीट आणि गाजर यांच्या मिश्रणामुळे शरीराला भरपूर लोह, व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात. तुम्ही सफरचं, बीट आणि गाजर हे ज्यूस नक्की प्या.
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा ओवा उकळून घ्या आणि चहासारखे कोमट प्या. ओव्यामुळे पोटाचे विकार दूर होतात
सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते शरीराचा थकवा दूर करते.