Breaking News Live : नौदल दिनानिमित्त कार्यक्रमात PM नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा

Breaking News in Marathi Live : देश विदेशासह राज्यभरातील प्रत्येक महत्वाच्या घडामोडी लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
Mizoram Assembly Election 2023 Result LIVE counting Updates bjp vs congress Maharashtra politics breaking news marathi latest batmya at SaamTV
Mizoram Assembly Election 2023 Result LIVE counting Updates bjp vs congress Maharashtra politics breaking news marathi latest batmya at SaamTVSaam TV

PM Narendra Modi Speech : नौदल दिनानिमित्त कार्यक्रमात PM नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा

नौदलातील पदांची नावं बदलणार, मोदींची घोषणा

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध

मिझोराममध्ये भाजपचा २ जागांवर विजय

मिझोराममध्ये भाजपने पलक आणि सैहा विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला. भाजप उमेदवार के. हाह्मो यांनी पलक मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार आणि मिझो नॅशनल फ्रंटचे नेते केटी रोखाव यांना पराभूत केलं. सैहा मतदारसंघाचे भाजप उमेदवार के बइछुआ यांनी एमएनएफचे नेते एच सी लालमलसावमा जसाई यांना पराभूत केलं. दरम्यान, राज्यात एमएनएफचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे.

ऐज्वाल: मिझोराम विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर झोरम पीपल्स मुव्हमेंटचे (झेडपीएम) प्रमुख आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार लाल्दुहोमा यांनी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली.
ऐज्वाल: मिझोराम विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर झोरम पीपल्स मुव्हमेंटचे (झेडपीएम) प्रमुख आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार लाल्दुहोमा यांनी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली. पीटीआय

Mizoram Assembly Election 2023 Result : मिझोराममध्ये ZPM ला बहुमत

मिझोराममध्ये झेडपीएमने विधानसभेच्या ४० पैकी २१ जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. विजयी उमेदवारांमध्ये पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार लालदुहोमा हे देखील आहेत. सेरछिप मतदारसंघात एमएनएफचे केजे. माल्सावमजुआला वानचावंग यांना पराभूत केलं आहे.

Pune Marathi Patya : मराठी पाट्यांबाबत व्यापारी संघटना-मनसेत बैठक

मराठी पाट्यांसंदर्भात पुणे शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

आज संध्याकाळी साडेचार वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर कार्यालयात होणार बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी पाट्यांवरून आक्रमक

तीन दिवसांपूर्वी शहरातील जंगली महाराज रस्ता व टिळक रोडवरील मराठी पाट्या नसलेल्या दुकानांची केली होती तोडफोड

त्या पार्श्वभूमीवर आज मनसे पदाधिकारी आणि व्यापारी यांच्यात होणार बैठक

Congress Meeting : काँग्रेस संसदीय पक्षाची आज बैठक

काँग्रेस संसदीय पक्षाची आज, सायंकाळी पाच वाजता होणार बैठक

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

५ राज्यांच्या निकालानंतर होणाऱ्या बैठकीला महत्व

Supriya Sule in Parliament Session: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

महाराष्ट्रात आणि माझा मतदारसंघ असलेल्या बारामतीत मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळं शेतीचे नुकसान झालंय. जास्त पाऊस किंवा दुष्काळामुळं शेतकरी चिंताग्रस्त आहे. दूध दरवाढीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. राज्याने प्रस्ताव पाठवला आहे; पण त्याला केंद्राने तात्काळ परवानगी द्यावी. शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी आणि हवामान बदलावर आपण सर्वांनी काम करावं. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरकारनं कर्ज माफ करावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

Mizoram Assembly Election 2023 Result LIVE: मिझोरामध्ये भाजपने उघडलं विजयाचं खातं; सर्वाधिक जागांवर कुणाची आघाडी?

मिझोराममधील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजयाचं खातं उघडलं आहे. काँग्रेसला मागे टाकत भाजपने दोन जागांवर विजय मिळवला आहे. सर्वाधिक २७ जागांवर झेडपीएम आघाडीवर आहे. सत्ताधारी एनएमएफ पिछाडीवर असून त्यांना केवळ १० जागांवर आघाडी घेता आली आहे. काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.

मिझोरममध्ये मुख्यमंत्र्यांचा पराभव

मिझोरममध्ये मुख्यमंत्री झोरामथांगा यांचा एका जागेवर पराभव झाला आहे. झेडपीएमच्या लालथनसांगा यांनी विद्यमान मुख्यमंत्री झोरामथांगा यांचा पराभव केलाय. २१०१ मतांनी मुख्यमंत्र्यांना पराभव स्वीकारावा लागला. 

मिझोरम निवडणुकीत मोठा उलटफेर; भाजपने काँग्रेसलाही टाकलं मागे

मिझोररम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) पक्षाने २८ जागांची आघाडी घेतली आहे. याशिवाय २ जागांवर विजय देखील मिळवला आहे. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) फक्त ७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने काँग्रेसला मागे सोडत ३ जागांची आघाडी घेतली आहे. काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडी घेता आली आहे.

Vidhan Sabha Nikal: मिझोरममध्ये झेडपीएमनं खोललं विजयाचं खातं

आघाडीवर असलेल्या झेडपीएमने मिझोरममध्ये पहिला विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री तवानलुइया तुईचांग यांचा पराभव झालाय. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, MNF फक्त १० जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय.

Mizoram Assembly Election 2023 Result LIVE: मिझोरममध्ये झेडपीएमची मोठी आघाडी, सत्ताधारी पिछाडीवर

विधानसभा निवडणूक निकालांचे प्राथामिक कल हाती येत आहे. सुरूवातीच्या कलानुसार, मिझोरममध्ये झेडपीएम 16 जागांवर आघाडीवर आहे. तर सत्तेत असणारा एमएनएफ पक्ष पिछाडीवर असून त्यांना केवळ ११ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. काँग्रेसला ५ ठिकाणी आघाडी आहे. तर भाजपने देखील एका जागेवर आघाडी घेतली आहे.

मिझोराममध्ये झेडपीएमची जातू, सुरुवातीच्या कलांमध्ये बहुमत, एमएनएफ आणि काँग्रेस पिछाडीवर

मिझोराममध्ये झेडपीएमची जातू, सुरुवातीच्या कलांमध्ये बहुमत, एमएनएफ आणि काँग्रेस पिछाडीवर

Mizoram Assembly Election 2023: झेडपीएम लवकरच ओलांडणार बहुमताचा आकडा

मिझोराम विधानसभा निवडणुकीत विजय मिळण्यासाठी बहुमताचा आकडा २१ आहे. सुरुवातीच्या आलेल्या कलांमध्ये झेडपीएम १८ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तर MNFने १२ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे.

Maharashtra Breaking News: राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं? आज महत्वाची सुनावणी

मिझोराम विधानसभा निवडणुकीत विजय मिळण्यासाठी बहुमताचा आकडा २१ ठेवण्यात आला आहे. सुरुवातीच्या आलेल्या कलांमध्ये झेडपीएम १८ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तर MNFने १२ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे.

Maharashtra Breaking News: राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं; आज महत्वाची सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं यावर आज निवडणुक आयोगात सुनावणी होणार आहे. सायंकाळी 4 वाजल्यापासून युक्तिवादाला सुरूवात होणार असून शरद पवार गटाचे वकिल देवदत्त कामत आज युक्तिवाद करणार

मागच्या सुनावणीवेळी शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड कशी योग्य आहे हे आयोगासमोर सांगितलं होतं. सोबतच अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा करण्याच कार्य म्हणजे विश्वासघातकी प्रकारातील असल्याचा युक्तिवाद केला होता

आजच्या सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून स्वता: शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. वंदना चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, आ. सुनिल भुसारा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर, अजित पवार यांच्या गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, समिर भुजबळ, सुरज चव्हाण उपस्थित रहाण्याची शक्यता आहे.

Mizoram Assembly Election 2023 Result LIVE: मिझोरममध्ये बहुमत कुणाला? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

 मिझोरममध्ये सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट आणि झोराम पिपल्स मुव्हमेंट मध्ये काटे की टक्कर होण्याचा अंदाज आहे. ४ पैकी ३ राज्यात पिछाडीवर पडलेली काँग्रेस मिझोरममध्ये गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.

मिझोरम एक्झिट पोल अंदाज

एमएमएफ – १४ ते १८ जागा

जेपीएम – १२ ते १६ जागा

कॉंग्रेस – ८ ते १० जागा

भाजपा – ० ते २ जागा

Mizoram Assembly Election 2023 Result LIVE: मिझोरममध्ये कोणाचे सरकार? थोड्याच वेळात मतमोजणी

४ राज्यांच्या विधानसभा निकालानंतर आज मिझोरम विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. मिझोरममध्ये ४० जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.  या निवडणुकीत एकूण १७४ उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), प्रमुख विरोधी पक्ष झोराम पिपल्स मुव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेसने ४०-४० जागावर निवडणूक लढली आहे. तर भाजपाने २३ आणि आम आदमी पार्टीने ४ जागांवर नशीब आजमाविले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com