Chandrashekhar Bawankule: 'राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 200 आमदार निवडून येतील'; ४ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भाजपचा मोठा दावा

Chandrashekhar Bawankule News: तीन राज्यात भाजपने मुसंडी मारल्यानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसून येत आहे. ४ राज्याच्या विधानसभा निकालावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
BJP
BJP saam tv
Published On

Chandrashekhar Bawankule On Election Results:

देशात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या चारही राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तर तेलंगणा वगळता काँग्रेस हे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात पिछाडीवर आहेत. तीन राज्यात भाजपने मुसंडी मारल्यानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसून येत आहे. ४ राज्याच्या विधानसभा निकालावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

4 राज्याच्या निकालावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

४ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ' भाजपला तीन राज्यात यश मिळालं, महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीचं वातावरण आहे. महायुती 45 च्या वर जागा निवडून येतील, त्यामुळे मोठा विजय आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. तेलंगणात काय झालं? कुठली ईव्हीएम मशीन गेली होती? काँग्रेसचा राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने पराभव झाला. छत्तीसगडमध्ये लोकांनी विश्वास दाखवला'.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात 18 पगड जाती आहेत. त्यांनी भाजपला मतदान केलं. त्या लोकांचा मोदींवर विश्वास आहे. जेव्हा काँग्रेस निवडून येते, तिथे तेव्हा ईव्हीएम खराब नसते. काँग्रेस पक्षाने पद्धतीनं 65 वर्ष भ्रष्टाचार आणि समाजाच्या गरीब कल्याण्याकरिता कुठलंही काम केलं नाही, असं ते म्हणाले.

'मोदींनी साडेनऊ वर्षात केलेल्या कामाचा विजय आहे. या कामाला मत मिळाले आहेत. मोदी यांच्या स्वच्छ सरकारला जनतेने मतदान केलं आहे, असं बावनकुळे म्हणाले.

'देशात ३५० च्यावर आणि महाराष्ट्रात ४५ प्लस खासदार विधानसभेत 200 आमदार महाराष्ट्रात निवडून येतील. राज्यात प्रचंड ताकदीने विजय प्राप्त करेल. या तिन्ही राज्याच्या निकालावरून दिसत आहे. मोदींवर टीका करणं जनतेला आवडत नाही, असेही ते म्हणाले.

निवडणूक निकालावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया

आशिष शेलार म्हणाले, 'आज एक दैदीप्यमान यश मिळालं. भाजप नेहमीच मानतं की लोकशाहीमध्ये निवडणुका लोकशाहीचा महोत्सव आहे. भाजपने विकासाच्या आधारावर मतदान आणि नागरिकांकडे मत मागितले. विरोधकांनी कधी विकासाकडे पाहिलं नाही. कधी नागरिकांच्या अपेक्षेकडे पाहिलं नाही. कधी त्या-त्या राज्यांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची भूमिका घेतल्या नाही. चारही राज्यातील मतदारांनी विरोधकांना जोरदार फटका दिला. तेलंगणामध्ये भाजप पक्षाची वाढ ही पाचपट झाली. 2024 चा निकाल स्पष्ट झाला आहे. आता देशात 400 जागांच ध्येय घेऊन काम करु'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com