Major Accident Saam tv
देश विदेश

Major Accident : रात्री एकत्र जेवण केलं, मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Major Accident in Uttar Pradesh : मध्यरात्री गाढ झोपेत कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये झोपडीत भरधाव ट्रेलर घुसल्याची घटना घडली. भरधाव ट्रेलर मध्यरात्री अनियंत्रित होऊन झोपडीत घुसला. या भीषण अपघातात एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गाझीपूरच्या माँ कामाख्या धामजवळी रस्त्याजवळ असलेल्या झोपडीत ट्रेलर घुसला. अनियंत्रित ट्रेलर झोपडीत घुसल्याने एकच खळबळ उडाली.

ट्रेलर गाझीपूरहून बिहारला निघाला होता. बिहारला जाताना भरधाव ट्रेलरने रस्त्याच्या जवळील झोपडीतील कुटुंबाला चिरडलं. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. लालजी जोम यांचं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून झोपडीत राहत आहे.

कुटुंबातील सदस्य नेहमी सारखे जेवण करून झोपी गेलं. त्यानंतर मध्यरात्री अनियंत्रित ट्रेलरने झोपडीत गाढ झोपी गेलेल्या कुटुंबाला चिरडलं. अपघातात लालजी डोम यांची ५ वर्षांची मुलगी कबूतरी, २ वर्षीय मुलगा ज्वाला आणि ७ वर्षीय मुलगी सपना या तिघांचा मृत्यू झाला. अपघातात लालजी यांची ३० वर्षीय पत्नी संतरा देवी आणि एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयायत दाखल केलं.

लालजी डोम बाहेर गेले होते. त्यामुळे थोडक्यात बचावले. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी या अपघात प्रकरणी ट्रेलर चालकाला बिहार बॉर्डरवरून अटक केली आहे. पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने लालजी डोम यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

SCROLL FOR NEXT