देश विदेश

Microplastics In Brain: 'मायक्रोप्लास्टिक'चा मेंदूवर होतो वाईट परिणाम, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Microplastics In Brain: प्लास्टिकच्या जागतिक वापरामुळे पर्यावरण दूषित झाले आहे. तर मायक्रोप्लास्टिक्स आता हवा, पाणी, माती, अन्न आणि मानवी अवयवांमध्ये आढळतात.

Bharat Jadhav

जगभरात प्लास्टिकचा वापर वाढला असून प्लास्टिकच्या वापराचा दुष्परिणाम नुसता पर्यावरणावर नाही तर थेट मानवी जीवनावर होत आहे. हवा, पाणी, माती, अन्न आणि अगदी मानवी अवयवांमध्ये हे छोटे प्लास्टिकचे कण आढळून येत आहे. काही दिवसांपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध झाला होता, ज्यात साखर, मीठ अशा पदार्थांमध्ये प्लास्टिकचे कण आढळून येत आहे, या पदार्थाच्या सेवनाने आपल्या शरीरात मीठ जात आहे.

नुकताच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार, मानवी मेंदूत मायक्रोप्लास्टिकचे कण दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे मायक्रोप्लास्टिक्स ही एक गंभीर आरोग्य आणि पर्यावरणीय समस्या बनले आहे. याचे मानवी आरोग्यावर आणि परिसंस्थेवर विपरीत परिणाम होईल, असा इशारा संशोधकांनी दिलाय.

द गार्डियन प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, वैज्ञानिक पुराव्यांचा दर्शवितो की मेंदूसह गंभीर मानवी अवयवांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स जमा होत आहेत. संशोधकांनी प्लॅस्टिक प्रदूषणाला लगाम घालण्यासाठी अधिक तातडीच्या कृतींची मागणी केली आहे. या अभ्यासात मानवी फुफ्फुसे, नाळे, पुनरुत्पादक अवयव, यकृत, मूत्रपिंड, गुडघा आणि कोपर सांधे, रक्तवाहिन्या आणि अस्थिमज्जामध्ये प्लास्टिकचे लहान तुकडे आणि ठिपके आढळून आलेत.

संशोधनाचे निष्कर्ष पाहता, प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी "जागतिक आणीबाणी घोषित करणे आता अत्यावश्यक आहे", असे तुर्कीतील कुकुरोवा विद्यापीठातील मायक्रोप्लास्टिकचा अभ्यास करणारे सेदाट गुंडोग्डू म्हणाले. मानव मायक्रोप्लास्टिक्सच्या संपर्कात आहेत, ज्याचा आकार 5 मिमी व्यासापेक्षा लहान तुकड्यांप्रमाणे असतो. प्लास्टिक तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे हवा, पाणी आणि अगदी अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचं प्रदूषण होत आहे.त्याच्या द्वारे मेंदूत मायक्रोप्लास्टिक मिळत आहे. यासंदर्भात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने मेंदूच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सच्या निर्मितीशी संबंधित एक संशोधन पेपर ऑनलाईन प्रसिद्ध केलं आहे. याचे पीअर रिव्ह्यू केलं जात आहे.

या अभ्यासाबाबत संशोधकांनी आपले मत व्यक्त केलंय. संशोधकांना 2024 च्या सुरुवातीला घेतलेल्या मेंदूच्या नमुन्यांमध्ये वजनानुसार अंदाजे 0.5% प्लास्टिक आढळले आहे. हे खूप चिंताजनक आहे. "आपल्या मेंदूमध्ये मी कधीही कल्पना केली नसेल की प्लास्टिकचा भाग आपल्या मेंदूत असेल, असं अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि विषशास्त्रज्ञ आणि न्यू मेक्सिको विद्यापीठातील फार्मास्युटिकल सायन्सेसचे प्राध्यापक मॅथ्यू कॅम्पेन म्हणालेत.

दरम्यान, फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि तुकड्यांसारख्या घटक मीठ आणि साखर नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळलेत, असे पर्यावरण संशोधन संस्थेने टॉक्सिक लिंक्सच्या अभ्यासात म्हटलंय. या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार 0.1 मिमी ते 5 मिमी इतका आहे. संशोधकांनी 10 प्रकारच्या मीठाचे नमुने तपासलेत. टेबल मीठ, रॉक मीठ, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्चे मीठाचे नमुने तपासण्यात आलेत. तसेच ऑनलाईन आणि स्थानिक बाजारातून खरेदी केलेल्या पाच प्रकारच्या साखरचे नमुने देखील काढण्यात आलेत. आयोडीनयुक्त मिठात (89.15 तुकडे प्रति किलो) मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण सर्वाधिक होते. तर सेंद्रिय मीठ सर्वात कमी (6.70 तुकडे प्रति किलो) आढळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT