Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

India Vs England Oval Test : इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवणं अत्यंत गरजेचे झाले आहे. जसप्रीत बुमराह खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वर्कलोड मॅनेजमेंट चालणार नाही, असेच संकेत प्रशिक्षक गौतम गंभीरकडून देण्यात आले आहेत.
jasprit bumrah available for oval test
jasprit bumrah available for oval testbcci/X
Published On
Summary
  • ओव्हल कसोटीत जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता

  • इंग्लंडविरुद्ध मालिकेतील अखेरचा कसोटी सामना निर्णायक ठरणार

  • गौतम गंभीरची वर्कलोड मॅनेजमेंटवर स्पष्ट भूमिका

  • दोन खेळाडूंना बाहेर करण्याचा विचार, अंतिम संघात बदल अपेक्षित

मँचेस्टर कसोटीत टीम इंडियानं इंग्लंडच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला आणि तब्बल १४३ षटके खेळून काढत सामना अनिर्णित ठेवला. या सामन्यात टीम इंडियाचा मानसिकदृष्ट्या विजय झाला असला तरी, ओव्हलच्या मैदानावर होणारा पाचवा कसोटी सामना जिंकण्याच्या इराद्यात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. वर्कलोड मॅनेजमेंट चालणार नाही असेच संकेत सामना संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिला आहे. सर्व वेगवान गोलंदाज तंदुरुस्त आहेत. कुणालाही काही दुखापत नाही, असं वक्तव्य सामना संपल्यानंतर गंभीरनं केलं होतं. त्यामुळं वर्कलोड मॅनेजमेंटचं कारण देत अवघे तीन कसोटी सामने खेळण्यासाठी आलेला जसप्रीत बुमराह हा पाचव्या कसोटीत खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चौथ्या कसोटी सामन्यानंतर गौतम गंभीरनं वर्कलोड मॅनेजमेंटवर भाष्य केलं होतं. वर्कलोड मॅनेजमेंट चालणार नाही, असेच संकेत त्यानं दिले होते. इंग्लंड दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहला पाचव्या कसोटी सामन्यात खेळावे लागणार आहे असे एकंदरीत संकेत मिळत आहेत. ओव्हलच्या मैदानावर ३१ जुलैपासून पाचवा कसोटी सामना सुरू होणार आहे.

टीम इंडियाला पाचवा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे. या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याच्या इराद्याने टीम इंडियाला मैदानात उतरावे लागणार आहे. गौतम गंभीरच्या टीम मॅनेजमेंटच्या वक्तव्यावरून तरी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीत खेळावं लागणार आहे. टीम इंडियातील सर्व वेगवान गोलंदाज सध्या तरी तंदुरुस्त आहेत आणि ते निवडीसाठी उपलब्ध आहेत, असे दिसते.

जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार की नाही (Will Jasprit Bumrah play the Oval Test?) याबाबत गंभीरनं अद्याप थेट काही सांगितलेले नाही. बुमराहच्या गोलंदाजीचा वेग मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर काही प्रमाणात कमी झाला होता. पण खेळपट्टीमुळं वेग कमी झाला असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडं त्याला मँचेस्टर कसोटीच्या चौथ्या दिवशी लंच ब्रेकआधी काही वेळ विश्रांती देण्यात आली होती.

ओव्हलमध्ये कशी असेल प्लेइंग इलेव्हन, गंभीर काय म्हणाला?

प्रशिक्षक गौतम गंभीरनं ओव्हल कसोटीसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दलही भाष्य केलं होतं. आम्ही अद्याप पाचव्या कसोटीसाठी टीम कशी असेल याबाबत चर्चा केली नाही. जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याबाबतही चर्चा झालेली नाही. अंतिमतः जो खेळेल तो देशासाठी आपल्याकडून सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करणार आहे, असं गंभीर म्हणाला होता.

शार्दुल ठाकूर-कंबोज बाहेर होऊ शकतात

टीम इंडियाच्या फलंदाजी क्रमावरून व्यवस्थापनावर जोरदार टीका झाली होती. बॅटिंग ऑर्डर चांगली ठेवण्यासाठी खास गोलंदाज असलेल्या कुलदीप यादवला खेळवलं नाही ही बाब क्रिकेटमधील तज्ज्ञ मंडळींना खटकली होती. नितीशच्या जागी मँचेस्टर कसोटीत शार्दुल ठाकूरला संधी दिली होती. त्याने केवळ ११ ओव्हर टाकल्या. तर फलंदाजी करताना ४१ धावा केल्या. त्यामुळं कुलदीप यादवला अखेरचा कसोटी सामना खेळवला पाहिजे या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे. तर पदार्पणात प्रभावी कामगिरी न केल्यानं अंशुल कंबोजला बाहेर बसावे लागू शकते. त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते.

jasprit bumrah available for oval test
IND VS ENG: पाचव्या टेस्ट सामन्यातून ऋषभ पंत बाहेर; 'या' नवख्या खेळाडूला टीम इंडियात संधी, BCCI ने केलं कन्फर्म

ओव्हल कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग ११

यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल, शुभमन गिल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव किंवा शार्दुल ठाकूर, अर्शदीप सिंग

पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ :

बेन स्टोक्स, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ओली पोप, जॅक क्रॉली, जोफ्रा आर्चर, एटकिंसन, ब्रायडन कार्स, लियाम डॉसन, बेन डकेट, जोश टंग, ख्रिस वोक्स, जेमी ओवर्टन, जो रूट, जेमी स्मिथ.

पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ

शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करूण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नारायण जगदीशन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग

jasprit bumrah available for oval test
Ind vs Eng : मँचेस्टरमध्ये भारताचा पराभव कसा टळला? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितला टर्निंग पॉइंट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com