Vasai News : वसईत ५ हजार किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; कारखान्यावर धाड टाकत कारवाई

Vasai News : १५ दिवस पाळत ठेवून कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली आहे, सदरच्या कारवाईत एकूण ५ हजार किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त
Vasai News
Vasai NewsSaam tv
Published On

महेंद्र वानखेडे
वसई
: प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र सर्रासपणे वापर केला जात असल्याचे पाहण्यास मिळते. विक्रेते देखील या कॅरीबॅगमध्ये ग्राहकांना वस्तू देत असतात. दरम्यान वसई- विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या बनविण्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे, 

Vasai News
Nashik Crime News : नाशिकमध्ये खळबळ; दिवसाढवळ्या वृद्ध महिलेची हत्या, घरात घुसून केला हल्ला

वसईच्या (Vasai) वाली परिसरातील गोलानी नाका येथे प्लास्टिक पिशव्या बनवण्याचा कारखाना सुरु आहे. या कारखान्याबाबतची माहिती सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांना मिळाली. यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी १५ दिवस पाळत ठेवून कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली आहे, सदरच्या कारवाईत एकूण ५ हजार किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा (Plastic Ban) जप्त केला आहे. जप्त केलेल्या प्लास्टिकची किंमत बाजारभावात सात ते आठ लाख रुपये असून सदरच्या कारवाईमुळे प्लास्टिक पिशव्या उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. 

Vasai News
Kalyan News : अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याने तक्रारदारच्या घरावर हल्ला; डोंबिवली कोपरमधील धक्कादायक घटना

नागरिकांना आवाहन 

दरम्यान वसई परिसरात प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली आहे. हि कारवाई मोठी असून अजून देखील अशा प्रकारचे कारखाने आपल्या आजूबाजूला प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन घेणाऱ्या कंपनी असल्यास त्याची माहिती पालिकेला द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com