Maharashtra Live News Update : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे आठ खांब उभारले

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक २९ जुलै २०२५, आज नागपंचमी, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे आठ खांब उभारले

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या गरुड मंडप पुनरुभारणीच्या कामांतर्गत मंगळवारी 8 लाकडी खांब उभारण्यात आले. इथे दोन महिन्यात 48 खांबांसह कमान उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे

कोल्हापूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

चंदगड तालुक्यातील प्रलंबित मागण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शेतकरी कर्जमाफी, निराधार, दिव्यांग पेन्शन, अतिवृष्टी भरपाई, बेळगाव - वेंगुर्ला रस्त्याचं काम प्रलंबित असल्याने याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे त्या पार्श्वभूमीवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने चंदगड येथे भीक मागून आंदोलन करण्यात आले. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नसल्यान शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चंदगड येथे भीक माग आंदोलन करून राज्य सरकार विरोधात तीव्र निदर्शने केलेत.

नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देताना झालेल्या तोडफोड प्रकरणी शंभराहून अधिक जणांवर गुन्हा दाखल

नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देताना झालेल्या तोडफोड प्रकरणी 100 हुन अधिक जणांवर गुन्हा दाखल

तोडफोड करणाऱ्या 39 जणांची नावे निष्पन्न तर 100 ते 125 अज्ञातांवर देखील गुन्हा दाखल

नांदणीमध्ये झालेल्या तोडफोडी मध्ये 12 पोलीस आणि पोलीस अधिकारी जखमी

राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि सहकारी सागर शंभूशेटे यांच्यावर देखील गुन्हा दाखल

पोलिसांच्या सात गाड्यांची जमावाने केली तोडफोड, 1 लाख 50 हजारांचे नुकसान

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक

- नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक

- जिल्हाधिकारी कार्यालयात केली प्रशासनाच्या लेखी आश्वासनाची होळी

- आज दुपारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलं होतं कांदा भाकर आंदोलन

- निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्याचं दिलं होतं लेखी आश्वासन

- मात्र संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लेखी आश्वासनाची होळी करत सरकारच्या कांदा विरोधी धोरणांचा केला निषेध

15 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू

तब्बल 15 तास वाहतुकीसाठी बंद असलेला मुंबई गोवा महामार्ग आता वाहतुकीसाठी सुरू झालेला आहे. हातखंबा येथे गॅस टँकर पलटी झाल्यानंतर या मार्गावरची वाहतूक होती बंद. अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतूक बंद होती छोट्या वाहनांना बावनदी ते पाली असा पर्यायी मार्ग होता.

रात्री 11 वाजता हातखंबा येथे टँकर पलटी झाला होता दुपारी 2.10 वा मार्गावरची वाहतूक सुरू, मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सध्या सुरू झाली आहे.

शेअर मार्केट फसवणुकीत चक्क चित्रपट निर्मात्याचा सहभाग

चीन देशातील एका नागरिकांच्या संपर्कात राहून पुण्यातील एका चित्रपट निर्मात्याने एका शेअर मार्केट मधील गुंतवणूकदाराला जवळपास 57 लाख 70 हजार 670 रुपयाचा आर्थिक गंडा घातला आहे.

Ratnagiri: रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

रात्री 11 वाजता घडला होता अपघात; दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी वाहतूक झाली सुरु

एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर रत्नागिरी जिल्ह्यातला हातखंबा इथं पलटी झाल्यामुळे वाहतूक होती ठप्प

टँकरमधील गॅस दुसरा टँकर मध्ये भरल्यानंतर वाहतूक सुरू

बारा तासाहून अधिक काळ मुंबई गोवा महामार्ग ठप्प राहण्याची मागच्या दोन महिन्यातील दुसरी घटना

Beed: श्रीमंत राजे यशवंत राजे होळकर धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचे तीन तेरा

श्रीमंत राजे यशवंत राजे होळकर यांच्या नावाने राज्यामध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून धनगर समाजातील विद्यार्थी यांना या योजनेमधून विविध लाभ दिले जातात या योजनेच्या माध्यमातून हंगामी वस्तीग्रह या वस्तीग्रह मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्याचबरोबर राहण्यासाठी आणि संपूर्ण सुविधा या शासनामार्फत मोफत दिल्या जातात मात्र या योजनेचे बीड जिल्ह्यात तीन तेरा वास्तांना पाहायला मिळत आहेत योजनेचे नावाखाली संस्थाचालक कोट्यावधी रुपये कमवतात मात्र सर्वसामान्यांचे लेकरं या संस्थेमध्ये शिकवण्यासाठी टाकले जातात मात्र त्यांना शासनाने दिलेल्या सुविधा दिल्या जात नाहीत

Raymond: रेमण्ड कामगारांची माजी आमदार बच्चू कडूंनी घेतली भेट

रेमण्ड कामगारांची माजी आमदार बच्चू कडूंनी घेतली भेट,आठ दिवसांपासून सुरू आहे कामगारांचा कामबंद आंदोलन

पगार वाढीच्या मागणीसाठी रेमण्ड कंपनीतील कामगारांच्या कामबंद आंदोलनाला बच्चू कडूंनी दिली भेट

माजी आमदार बच्चू कडू यांनी कामगारांची भेट घेऊन पायदळ चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक

अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या सोबत रेमण्डच्या कामगारांच्या प्रश्नावर केली चर्चा,तोडगा काढण्या बाबत केली अप्पर जिल्हाधिकाऱ्यासोबत चर्चा

महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांचे अभिनंदन

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या ग्रँण्डमास्टर दिव्या देशमुख यांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांकडून अभिनंदनाचा ठराव मंजूर.

राज्यातील कंत्राटदार ठेकेदारांची 90 हजार कोटी रुपयांची बिल थकीत, 15 ऑगस्ट पासून राज्य सरकार विरोधात होणार संघर्ष

महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोठा ताण आल्यामुळे सध्या राज्यातील बांधकाम विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांवर देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे. 90 हजार कोटी रुपयांची देणे भगवा, अन्यथा 15 ऑगस्ट पासून नव्याने राज्य सरकार विरोधात संघर्ष उभा करण्याच्या तयारीत हे कंत्राटदार आहेत. कर्जाच्या आणि व्याजाच्या बोजाखाली सापडलेल्या या कंत्राटदारांची मानसिकता सध्या सांगली जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या हर्षल पाटील यांच्याप्रमाणे झाल्याचं काही कंत्राटदारांनी सांगितले आहे....

16 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

बीड:करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत आज परळी न्यायालयात सुनावणी पार पडली

धनंजय मुंडे यांच्या वकिलाची तब्येत खराब असल्यामुळे 16 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दाखल केले जाणाऱ्या शपथपत्रात पत्नी करुणा मुंडे यांच्या बाबतचा उल्लेख आणि त्यांच्या संपत्ती बाबतचा उल्लेख घडल्याची तक्रार स्वत. करुणा मुंडे यांनी केली होती

धनंजय मुंडे त्यांच्या वकिलांची तब्येत खराब असल्यामुळे 16 ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे

आज आम्ही न्यायालयासमोर दोन्ही मुलांचे पासपोर्ट दिले आहेत. यामध्ये दोन्ही मुलांचा उल्लेख असून धनंजय मुंडे यांचे देखील उल्लेख आहे . न्यायालयाने 16 ऑगस्ट पर्यंत आपले काय म्हणणे आहे ते मांडण्यात यावे त्यानंतर निकाल दिला जाईल.

सुप्रिया सुळे यांनी व्यथित होऊन खोटा आरोप केलाय - पंकज भोयर

- लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या बहिणीकरीता महिला सक्षमिकरणासाठी सुरु करण्यात आली आहे.

- आपण बघितलं की आज आपल्या राज्यातल्या करोडो बहिणी त्याचा लाभ घेत आहे.

- लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये फार मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

- त्यामुळे लाडक्या बहिणींनी देखील महायुतीवर विश्वास दाखवत एकहाती सत्ता महायुतीला दिली आहे.

- अश्या वेळी व्यथित होऊन सुप्रिया ताईनी खोटा आरोप केलेला असावा.

Pravin Darekar: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर प्रवीण दरेकर यांची एक हाती सत्ता

महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर प्रवीण दरेकर यांची एक हाती सत्ता

21 जागांपैकी १९ जागांवर प्रवीण दरेकर यांचा पॅनल विजयी

दोन जागा विरोधी पक्षाला

माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरी ईडीची छापेमारी; ५ तासापासून तपास सुरु 

वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरी सकाळी 6 वाजल्यापासून ईडीची छापेमारी सुरू आहे.

तब्बल पाच तासांच्या चौकशी नंतर ईडीच्या सुरक्षा रक्षकांनी आता आयुक्तांच्या मुलीलाही वसईच्या शासकीय निवासस्थानी चौकशीसाठी घेऊन आले आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मनसे मैदानात

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज बैठक होणार

शाखाध्यक्ष यांची बैठक आज पार पडत आहे

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून खुरपोषणाचं ग्रहण...

पावसाळ्यापूर्वी कुपोषित बालकांची धडक शोध मोहिमेत धक्कादायक आकडेवारी आली समोर....

तपासणी दरम्यान 2 हजार 878 बालके निघाले अति तीव्र कुपोषितग्रस्त...

शोध मोहिमेत यंदा एक लाख 62 हजार 399 बालकांची तपासणी...

जिल्हाभरातील सहा तालुक्यातील एकूण 2 हजार 562 अंगणवाड्यांमध्ये करण्यात आला सर्वेक्षण...

Wardha: आष्टी शहीद स्मृती दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी केले अभिवादन

वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद या गावानंही स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. महात्मा गांधी यांच्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्याकाळात आष्टीचे काही तरुण व मध्यमवयीन स्वातंत्र्य सैनिक पोलीस ठाण्याजवळ सत्याग्रहाला बसले होते. त्यावेळी 16 ऑगस्ट 1942 ला नागपंचमी होती. शांततेत आंदोलन सुरू असताना ब्रिटिशांनी त्यांच्यावर गोळीबार केला यात काही सत्याग्रही ठार झाले.त्यानंतर नागरिकांची एकजूट वाढली आणि ब्रिटिशांच्या पोलीस ठाण्यावर मोर्चाच काढला. त्यांनी इंग्रजांचे पोलीस ठाणे आणि त्यावरील 'युनियन जॅक' जाळला. त्या दिवसभर पोलीस ठाण्यावर युनियन जॅक नव्हे तर भारताचे प्रतिनिधीत्व करणारा झेंडा फडकत होता. त्या दिवसापुरते आष्टी हे गाव स्वतंत्र झाले होते.तेव्हापासुन नागपंचमीला शहीद स्मृती दिन साजरा केला जातो.आष्टी येथे आयोजित या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी, जिल्हापोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती होती.

Amravati: अमरावतीत श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे मार्गदर्शन बैठक सुरू...

मार्गदर्शन बैठकीला संभाजी भिडे मार्गदर्शन करणार आहे..

संभाजी भिडे यांचं आगमन.. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात..

अमरावती शहरातील जय भारत मंगलम याठिकाणी ही मार्गदर्शन बैठक सुरू..

Nashik: नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचं स्वरूप; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन

- कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

- कांदा उत्पादक शेतकरी गनिमी काव्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर करणार आहेत आंदोलन

- शेतकऱ्यांच्या गनिमी काव्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वार आणि परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

- दंगा नियंत्रण पथक देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात

Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदारांना जिल्हा विकासाची कामे मिळत नसल्याची ओरड

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदारांना जिल्हा विकासाची कामे मिळत नसल्याची ओरड होत आहे. सुमारे 400 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत स्थानिक नसलेल्या कंपन्यांना झुकते माप दिले जात आहे. स्थानिक कंत्राटदारांनी रोष व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांना बदनाम करत अधिकारी बड्या ,स्थानिक नसलेल्या कंपन्यांना कंत्राट देत असल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केला आहे . या पुढच्या काळात स्थानिक कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेत सहभागी करत कामे न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

वाशिमच्या तिरुपती सिटीमध्ये १६ लाखांची धाडसी चोरी

वाशिम शहरातील तिरुपती सिटीत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मोठी चोरी केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश करत 16 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

राऊत कुटुंब घराला कुलूप लावून आठ दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून घरातील सुमारे १३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ३ लाख रुपये रोख रक्कम, असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. कोकाटे यांना समज दिली असून बोलताना भान ठेवा, असे सांगण्यात आले आहे. कोकाटे यांना मंत्रिपदाचे अभय देण्यात येणार आह. कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रालय काढून घेतलं जाणार असून त्यांना नव्या मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

पोलिसांनी पाळत ठेवल्याचा रोहिणी खडसे यांचा दावा

पुण्यातील प्रांजल खेवलकर यांच्या घराबाहेर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा रोहिणी खडसे यांचा दावा

एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलिस कर्मचारी बाहेर होते

यावर रोहिणी खडसे यांनी सकाळपासून आमच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Maharashtra Live News Update : अनिल परब घेणार देवेंद्र फडणवीस यांची भेट, नेमकं कारण काय?

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. ही भेट नेमकी कोणत्या कारणामुळे होत आहे, याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांची माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना समज दिल्याची माहिती समोर आली आहे. माणिकराव कोकाटे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात गेले होते. त्यावेळी वादग्रस्त वक्तव्य आणि रमी गेम यावरून अजित पवार यांनी कोकाटे यांना समज दिली आहे.

बोलताना भान ठेवा, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते, असे अजित पवार यांनी कोकाटे यांना समज दिली आहे.

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

नाशिकच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाची वाट खडतर

- ऐन श्रावणात शिवभक्तांना त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सहन करावा लागतोय मनस्ताप

- नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण

- नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडले मोठ मोठे खड्डे

- खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांना करावी लागतेय तारेवरची कसरत

- नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची वर्षातून तीनदा दुरुस्ती

- दुरुस्तीसाठी तब्बल ३ कोटींचा खर्च, मात्र तरी देखील नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता खड्ड्यातच

- सार्वजनिक बांधकाम विभागाचं कंत्राटदाराकडे बोट, तर दंड ठोठावूनही कंत्राटदाराकडून दुरुस्ती नाही

- त्यामुळे भाविक आणि प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण

पुणे न्यायालयात आज पुन्हा होणार सुनावणी

न्यायालयात आजपासून साक्षी पुराव्याला सुरवात होणार

या आधी राहुल गांधी यांना या प्रकरणात मिळाला आहे जामीन

सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामीची केली आहे या आधीच याचिका दाखल

पुणे न्यायालयात आज राहुल गांधी यांच्या बाजूने एड मिलिंद पवार मांडणार बाजू

Shravan: श्रावण मासानिमित्त 5 हजार महिलांनी घेतला-बांगडया आणि मेहंदीचा आनंद

महाराष्ट्राची संस्कृती जपत आपले सण-उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि सातत्याने त्यांचे जतन व्हावे, याकरिता पुण्यामध्ये श्रावण मासानिमित्त नागपंचमिचे औचित्य साधून5 हजार महिलांनी बांगड्याा भरणे आणि मेहंदी काढण्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमाला राज्य महिला आयोग अध्यक्षारूपालीताई चाकणकर यांनी उपस्थिती लावत बांगड्याा भरुन मेहंदी काढण्या सोबतच फुगडी खेळण्यात महिलांसोबत सहभाग घेतला.

Mumbai-Agra Highway: मुंबई आग्रा महामार्गावर सावळदे फाटा येथे एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात

अपघातामध्ये बस मधील जवळपास 12 ते 15 प्रवासी जखमी झाले आहेत

शिरपूर हून शिंदखेडाकडे जात होती बस

जखमींमध्ये तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती

जखमींना शिरपूर शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी तात्काळ करण्यात आले दाखल

तिघा जखमींची प्रकृती चिंताजनक

बस चालकाच्या अति घाईमुळे हा अपघात झाला असल्याची माहिती

Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत बॉयलरला आग

बदलापूरमध्ये रासायनिक कंपनीत बॉयलरला आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यावेळी बदलापूर नगरपरिषद आणि एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत AVA (एव्हीए) केमिकल नावाची कंपनी आहे. या कंपनीत रासायनिक उत्पादन केलं जातं. या कंपनीतील बॉयलरला सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली.

Timetable: इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल

एससीईआरटीकडून इयत्ता तिसरी ते दहावीसाठी अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार

आराखड्याचा मसुदा तयार करून पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ञ यांना उपलब्ध

www.maa.ac.in या संकेतस्थळावर मसुदा उपलब्ध

कसा आहे हा नवीन मसुदा

इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी असणाऱ्या 'परिसर अभ्यास' (भाग-एक आणि दोन) विषयाऐवजी 'आपल्या सभोवतालचे जग (भाग एक आणि दोन) हा विषय

भाग एकमध्ये विज्ञान आणि भूगोल विषयातील आशयाचा समावेश

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरी ईडीची धाड

वसई विरार शहर पालिकेचा पदभार सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी छपेमारी

वसई विरार शहरातील तब्बल 12 ठिकाणी ईडीची छापेमारी

नालासोपाराच्या 41 इमारतीच्या मनीलॉन्ड्री प्रकरणात आयुक्तांची चौकशी होत असल्याचे सूत्रांची माहिती

शरद पवार गटाला खिंडार; नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते आज करणार भाजपात प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा धडाका सुरू

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेतील शरद पवार गटाला खिंडार

आज शरद पवार गटाचे मोठ्या संख्येने नगरसेवक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करणार पक्ष प्रवेश

आज दुपारी ०३:०० वाजता होणार भाजपा पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा

पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोबावर गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल

कोंढवा परिसरातील जागेवर ताबा मिळवण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना दिले लेखी अधिकार पत्र

कोंढवा परिसरातील जागेवर ताबा मिळविण्यासाठी दोन गटांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता

जागा ताब्यात घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल यांनी एका गटातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना लेखी अधिकारपत्र दिल्याचा प्रकार समोर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही धर्मनिरपेक्षता या शब्दाचे समर्थन केले नाही असा दावा विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केलाय.

हे पोलीस प्रशासनाचे मोठं अपयश आहे- आ.प्रकाश सोळंके

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला 22 महिने पूर्ण झाली आहेत.मात्र या हत्या प्रकरणातील अद्याप एकही आरोपी निष्पन्न झाला नाही यावर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त करत हे पोलीस प्रशासनाचे मोठं अपयश म्हणावं लागेल पोलिसांवर नेमके दबाव कोणाचा आहे? की पोलीस जाणून-बुजून कार्यवाही करत नाहीत हे पाहावं लागेल मात्र राज्य सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही विधिमंडळात याप्रकरणी आम्हीही आवाज उठवला आणि मुख्यमंत्र्यांनीही म्हटले आहे की या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातला जाणार नाही मात्र आरोपी कधी निष्पन्न होणार आणि पोलीस यंत्रणा करते काय असा प्रश्न प्रकाश सोळंके की यांनी व्यक्त केला आहे.

इलेक्ट्रिक बस टोल माफीची घोषणा हवेतच

पर्यावरण पूरक प्रवासासाठी सुरू केलेल्या एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसना टोल माफ करण्याची घोषणा सरकारने केली. मात्र प्रत्यक्षात अध्यादेश न आल्याने राज्य परिवहन महामंडळाला दर महिन्याला किमान 10 लाख 85 हजार रुपयांचा टोल भरावा लागत आहे. सातारा विभागातून पर जिल्ह्यात जाणाऱ्या आणि विशेषतः सातारा - स्वारगेट मार्गावरील दररोज संचलन करणाऱ्या ई - बसची संख्या जास्त असल्याने महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक भरदंड सोसावा लागत आहे.

शेतकऱ्याच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले, तात्पुरत्या स्वरूपात एक लाखांची मदत

विजेच्या धक्क्याने धाराशिवच्या खामसवाडी येथील अनिल गुंड या शेतकऱ्याचा मृत्यू झाला घरातील कर्ता पुरुष गेल्याने तीन मुलींचा पत्नीचा परिवार उघड्यावर आला. त्यांना मदतीसाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावलेत.दुःखाचा डोंगर कोसळलेल्या गुंड कुटुंबाला तात्पुरत्या स्वरूपात एक लाखांची मदत केली असून त्यांना हक्काचं घर उभा करण्यासाठी ही मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले अनिल गुंड शेतात काम करत असताना विजेच्या तुटलेल्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाला.मुलींना शिकऊन मोठं करायचं अनिल यांचे स्वप्न अर्धवटच राहील,उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला मदतीसाठी गावकऱ्यांकडून मदतीचा आवाहन करण्यात आलं होतं. तीन मुलींपैकी मोठी मुलगी पाचवीत, दुसरी मुलगी तिसरीत आणि लहान मुलगी अंगणवाडीत अनिल गुंड यांच्या पश्चात एकट्या पत्नीवर तीन मुलींना संभाळण्याची जबाबदारी आहे.

Maharashtra Live News Update : रायगडात सुनील तटकरे यांचा भरत गोगावले यांना दे धक्का

रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला मोठा धक्का देत आहे. मंत्री भरत गोगावले यांचे निकटवर्तीय आणि भरत गोगावले यांच्या मतदार संघातील महत्वपूर्ण कार्यकर्ते राजू साबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. 2 ऑगस्टला माणगाव येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उपस्थितित हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. साबळे यांच्या सोबत माणगाव नगर पंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक देखील राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. त्यामुळे माणगाव नगर पंचायतीतील शिवसेनेची सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सद्या रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत सुरू असलेल्या वादात खा. सुनिल तटकरे यांनी गोगावले यांना दिलेला मोठा धक्का म्हणून या पक्ष प्रवेशाकडे पहिल जात आहे.

मनसेचा गोरेगावच्या फायनान्स कंपनीला दणका

रायगडच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून 38 मच्छिमारांवर कारवाई

बंदी आदेशाचे उल्लंघन करीत मासेमारी केल्या प्रकरणी रायगड जिल्ह्यात 38 मच्छिमारांवर कारवाई करण्यात आली आहे. यात 8 बोटी जप्त करण्यात आल्या असून 29 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय विकास विभागाने ही कारवाई केली आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी असते. मात्र ही बंदी झुगारून रायगडमध्ये मासेमारी केली जात होती. तीन दिवसांपूर्वी अलिबागच्या समुद्रात खांदेरी किल्ल्याजवळ मच्छीमार बोट बुडाली आणि तीन मच्छीमारांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेची दखल घेत मत्स्यव्यवसाय विभाग ॲक्शन मोडवर आला आहे.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत. शिवतीर्थावर दोन्ही भावांमध्ये भेट होणार आहे. भेट कधी होणार, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

शाळेत जात असताना ट्रॅक्टरच्या धडकेत 10 व्या वर्गातील विद्यार्थिनी जागीच ठार

मैत्रिणीसोबत सायकलवरून शाळेकडे निघाली. पण, नियतीच्या मनात काही औरच होते. रस्त्यावरील चिखलामुळे तिची सायकल स्लीप झाली. ती खाली कोसळली अन् समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या लोखंडी भागाने डोक्याला जबर धडक दिली. या अपघातात सिमरन श्याम ठवकर (१५, रा. बाम्हणी) ही जागीच ठार झाली. सोबतच्या इतर मैत्रिणी थोडक्यात बचावल्या. हा हृदयद्रावक अपघात बाम्हणी रस्त्यावर घडला.बाम्हणी येथून सिमरन ही चार मैत्रिणींसोबत सायकलवरून शाळेत जाण्यासाठी निघाली. थोड्या अंतरावरच गेली असताना कोष्टी शिवारात एका घराजवळ रस्त्याशेजारी चिखल साचला आहे. त्या चिखलातून सिमरनची सायकल स्लीप झाली. एवढ्यातच समोरून ट्रॅक्टर आले. ट्रॅक्टरच्या मागचा लोखंडी भाग सिमरनच्या डोक्याला लागला. डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. ती जागीच गतप्राण झाली.

नाशिक महापालिका बसवणार धोक्याचा इशारा देणारे १२ भोंगे

- महापालिका कार्यालयासह शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बसवणार धोक्याचा इशारा देणारे १२ भोंगे

- तब्बल सव्वा तीन किलोमीटरपर्यंत ऐकू येणार भोंग्यांचा आवाज

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क करण्यासाठी बसवण्यात येणार धोक्याचा इशारा देणारे भोंगे

- कुंभमेळ्यादरम्यान एखादी दुर्घटना अथवा अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांना सतर्क करण्यासाठी होणार वापर

- पहलगाम घटनेनंतर देशभरात हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन बसवण्याचे केंद्राचे निर्देश

- केंद्राचे निर्देश आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता धोक्याचा इशारा देणारे भोंगे बसवण्याचा निर्णय

उल्हासनगरात विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

उल्हासनगरच्या पंजाबी कॉलनी परिसरात राहणारा १७ वर्षीय आयुष रॉय ह्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, या घटनेनंतर कुटुंबीयांनी महावितरणच्या विरोधात आरोप केले आहे,दोन दिवसांपूर्वी आयुष रॉय याच्या घराचा वीज पुरवठा खंडित झाला होता,याविषयी त्यांनी संबंधित महावितरण कार्यालयात तक्रार दाखल केली होती. परंतु वीज दुरुस्ती न झाल्याने आयुष रॉय हा तरुण पत्र्यावर चढून विजेची वायर पाहत होता,यावेळी त्याला जोरदार शॉक लागला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे,याविषयी रॉय कुटुंबियांनी महावितरणच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

सांगली.... सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी

सांगलीच्या 32 शिराळ्याची नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करताना,केंद्र सरकारकडून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या एका परवानगीमुळे शिराळाकरांना जिवंत नागाचे दर्शन होणार आहे.त्यामुळे शिराळकरांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जिवंत नागांच्या पूजेवर बंदी घालण्यात आल्यानंतर गेल्या 23 वर्षांपासून शिराळकर हे प्रतिकात्मक नागांची पूजा करून न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करत होते.मात्र यंदा केंद्र सरकारने शिराळकरांना नागपंचमीला जिवंत नागांचे दर्शन होणार आहे.शैक्षणिक अभ्यास आणि सर्प संवर्धन पारंपारिक प्रचार करण्याच्या उद्देशाने 21 शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता शिराळकरांना नागपंचमी साजरी करताना यंदा जिवंत नागांचे दर्शन देखील होणार आहे,त्यामुळे शिराळाकरांकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे.

पैनगंगा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प ईसापुर धरणाचा पाणीसाठा 75 टक्के झाल्यामुळे संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवित व वित्तहानी होऊ नये यासाठी पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद,उमरखेड,खंडाळा,पोफाळी आणि महागांव तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.पाण्याची पातळी वाढल्यास प्रकल्पातून नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणुन नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे दिंडोरी तालूक्यातील वाघाड धरण पुर्ण क्षमतेने भरुन त्याचे पाणी कोलवण नदी पात्रा द्रवारे पालखेड धरणात पोहचत असल्याने पालखेड धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.त्यामुळे धरणातून पुन्हा रात्री विसर्गात ७७२ क्युसेस ने वाढ करुन धरणातून १५४४ क्युसेस ने कादवा नदीत पात्रात सोडण्यात आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

श्रावण सरींनी जळगावकरांना दिलासा

जळगाव गेल्या चार ते पाच दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने असह्य उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठीही या श्रावण सरी 'जीवनदायी' ठरल्या आहेत. गेल्या चार-पाच दिवसात जिल्ह्यात एकूण ५० मिमी. पावसाची नोंद झाली असून, सोमवार, काल पासून जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

पुणे ड्रग्स पार्टी प्रकरण अपडेट

डॉ प्रांजल खेवलकर यांच्यासह ६ जणांना आज पुन्हा न्यायालयात हजर करणार

ड्रग्स पार्टी प्रकरणी ६ जणांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने पुन्हा हजर करणार

६ जणांच्या पोलिस कोठडी मध्ये वाढ होणार का न्यायालयीन कोठडी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं

पुणे पोलिस पोलिस कोठडी मिळण्यासाठी युक्तिवाद करण्याची शक्यता

आरोपींना न्यायालयीन कोठडी आणि जामीन मिळावा अशी बाजू आज आरोपींचे वकील न्यायालयात मांडणार

उद्यापासून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

३१ जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठव्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

मुंबई, कोकण सह राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस घेणार विश्रांती, हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला अंदाज

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून दिवसभरातील तापमान वाढल्यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या सरींची शक्यता

पुणे शहरासह जिल्ह्यात रात्री पावसाची रिपरिप

आज पहाटेपासून पावसाने घेतली विश्रांती

पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आणि धरण पाणलोट क्षेत्रात रात्री तुरळक सरी

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

एकनाथ खडसे काय बोलणार याकडे लक्ष

सकाळी १० वाजता एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

जावयाला अटक केल्यानंतर कालपासून खडसे पुण्यात

काल एकनाथ खडसे यांनी कायदेतज्ञ असिम सरोदे यांची घेतली होती भेट

ड्रग पार्टी प्रकरणात खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी केली आहे अटक

नांदणी मठाच्या महादेवी हत्तीनीला वनतारा कडे घेऊन जाताना ग्रामस्थ भडकले

हत्तीनीला घेऊन जाताना काही नागरिकांनी केली पोलीस क

गाड्यांवर तुफान दगडफेक

पोलीस प्रशासनाच्या सहा आणि खाजगी दोन गाड्या फोडल्या

दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी दिला लाटीचा प्रसाद

हत्तीनीला वनतारा कडे घेऊन जाताना नागरिकांकडून करण्यात आला मोठा गोंधळ

जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केला लाठी चार्ज

- नागपुरात बारमध्ये सरकारी फाईली प्रकारणात चौकशी सुरू झाली आहे.

- बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारमधील सरकारी फाईलचा व्हिडीओ आहे.

- सूत्रांच्या माहितीनुसासर पोलिसानी व्हिडीओ ताब्यात घेतल्याचं बोललं जातं आहे, तो बार नागपूरातील असला तर ते अधिकारी बाहेरगावचे असल्याची चर्चा आहे..

- यात बांधकाशी संबंधित फाईल असल्यान बांधकाम विभागाच्या तर नाही ना अशी ही शंका व्यक्त केली कात आहेय.

- पोलीस आयुक्तांनी सुद्धा या तिघांचं शोध घेण्याचा सूचना केल्यानं पोलीस यंत्रणा कामाला लागली आहेय..

Maharashtra Live News Update: फडणवीस यांच्या आमदारकीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारकीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

- याआधी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली होती.

- दक्षिण - पश्चिम विधानसभा क्षेत्रातील देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पराभूत उमेदवार प्रफुल गुढधे पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात दिले आव्हान...

- उच्च न्यायालयात फडणवीसांच्या वकिलांनी याचिका लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम 81(1) मधील निकष पूर्ण करत नसल्याचा युक्तिवाद केला होता....यानंतर उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली होती.

- परंतु याचिकेच्या गुणवत्तेवर उच्च न्यायालयात चर्चा चर्चा झाली नाही... त्यामुळे या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com