Aljazeera
देश विदेश

Mexico News: आनंदाचं वातावरण क्षणात दु:खात बदललं; धार्मिक कार्यक्रमात अंधाधुंद गोळीबार, १२ जणांचा मृत्यू

Mexico : मेक्सिको मधील ग्वानाजुवाटोच्या इरापुआटो शहरात स्थानिक लोक सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांच्या जयंती निमित्त आनंद साजरा करत असताना गोळीबार झाला. या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रस्त्यावरील हिंसाचाराचा भयानक इतिहास असलेल्या मेक्सिकोमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मेक्सिकोमधील नागरिक संद्याकाळच्या सुमारास आनंदोत्सव साजरा करत असताना अंदाधुंद झालेल्या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मेक्सिकोमधील ग्वानाजुवाटो भागात घडली आहे.

गेल्या महिन्यातील ग्वानाजुआटोमधील सॅन बार्टोलो डी बेरिओस येथे कॅथोलिक चर्चने आयोजित केलेल्या पार्टीला लक्ष्य करून केलेल्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना, मेक्सिकोमधील हिंसाचारग्रस्त मानल्या जाणाऱ्या ग्वानाजुवाटोच्या इरापुआटो शहरात स्थानिक लोक सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाचत होते तसेच मद्यपान करत होते. आनंदाने रंगलेल्या या संद्याकाळी गोळीबार झाल्याने स्थानिक नागरिकांच्या आनंदावर विरजण पडलं. सोशल मीडियावर ऑनलाईन व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार लोक घाबरून सैरावैरा पळत असल्याचे चित्र दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तरुण मंडळी रस्त्यावर बेधूंद नाचत आहेत. सगळीकडे मज्जा मस्तीचे वातावरण असताना अचानक गोळीबार सुरु झाला. गोळीबाराच्या आवाजाने व्हिडिओमधील तरुण मंडळी इकडे तिकडे धावताना दिसत आहे. यानंतर तिथे गोंधळ वाढल्याचं दृश्य निर्माण झालं.

इरापुआटोचे अधिकारी रोडोल्फो गोमेझ सर्व्हेंटेस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, बळींची संख्या १२ वर पोहोचली आहे.तर या घटनेत सुमारे २० जण जखमी झाले आहेत. मेक्सिकोच्या राष्ट्राअध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर घडलेल्या दुर्घटनेची लवकरात लवकर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

गुन्हेगारी गटातील सुरु असलेल्या युद्धांमुळे मेक्सिको हिंसक राज्यांपैकी एक बनले आहे. या राज्यात वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत १४३५ इतकी खून संख्या नोंदवली गेली आहे. हा आकडा कोणत्याही राज्याच्या हिंसक संख्येच्या दुप्पट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT