Mexico Bus Accident: मॅक्सिकोमध्ये भीषण अपघात, 40 प्रवाशांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली; 27 जणांचा मृत्यू

Bus Crash In Mexico Today: अपघातामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचा तपास मॅक्सिको पोलिसांकडून (Mexico Police) सुरु आहे.
Mexico Bus Accident
Mexico Bus AccidentSaam Tv
Published On

Mexico News: मॅक्सिकोमध्ये बसला भीषण अपघात (Mexico Bus Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. मॅक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका राज्यात ही घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचा तपास मॅक्सिको पोलिसांकडून (Mexico Police) सुरु आहे.

Mexico Bus Accident
Hyderabad Gold Seized By Customs: अंडरवेअरमधून करत होता 20 लाखांच्या सोन्याची तस्करी, एअरपोर्टवर पोहचताच झाली पोलखोल; पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ओक्साका राज्यात बस दरीत कोसळल्याची घटना घडली. मॅग्डालेना पेनास्को शहरात सकाळी 6.30 च्या सुमारास बसला अपघात झाला. डोंगराळ भागातून ही प्रवासी बस जात होती. अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. प्रवाशांनी भरलेली बस बुधवारी मेक्सिको सिटीहून योसुंडुआला जात होती. या बसमधून 40 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आणि 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Mexico Bus Accident
Pune Nashik Accident News : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यासह अंगरक्षक अपघातातून बचावले

मॅक्सिको पोलिसांनी या अपघाताबाबत माहिती दिली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. ओक्साकाच्या गव्हर्नरने ट्वीट करून अपघाताची माहिती दिली. त्लाक्सियाओ सिव्हिल प्रोटेक्शन कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये एक वर्षाचे बाळ, 13 महिला आणि 13 पुरुषांचा समावेश आहे.

Mexico Bus Accident
Uttar Pradesh Crime News: घरात आढळले पाच जणांचे मृतदेह, पतीने पत्नी आणि ३ मुलांची हत्या करून केली आत्महत्या

हा अपघात नेमका कसा झाला या मागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे. बसमध्ये तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक वाहतूक कंपनीची ही बस मंगळवारी (4 जुलै) रात्री राजधानी मेक्सिको सिटी येथून निघाली होती आणि सॅंटियागो डी योसुंडुआ शहराकडे जात होती. राज्य अधिकारी जीसस रोमेरो यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसला अपघात झाला. ही बस 80 फूटांपेक्षा जास्त खोल दरीत कोसळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com