Mental Health issue Saam tv
देश विदेश

Mental Health : मर्द को भी दर्द होता है! महिलांपेक्षा पुरुष नैराश्यात, कारण काय? वाचा सविस्तर

Mental Health issue : तुम्ही महिला हक्क आयोग ऐकला असेल...पण आता महिलांपेक्षा पुरुषांच्या नैराश्यात वाढ झालीय... त्याला महिला कारण असल्याचं सांगत पुरुष हक्क आयोगाची मागणी करण्यात आलीय... मात्र ही मागणी कुणी केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Snehil Shivaji

धावत्या जगात नैराश्याचं प्रमाण वाढलंय. आणि या नैराश्यात महिलांपेक्षा पुरुषांनी आघाडी घेतलीये. तशी धक्कादायक आकडेवारीच समोर आली. मानवी आरोग्यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागानं सुरु केलेल्या टेलिमानस या हेल्पलाईनवर कॉल करुन मदत घेणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची सध्या ७० टक्के इतकी असल्याची धक्कादायक आकडेवारीच समोर आली.

1.

महिलांपेक्षा पुरुष अधिक नैराश्यात

पुरुष 67.99 %

महिला 31.50 %

2.

महिलांपेक्षा पुरुष अधिक नैराश्यात

हेल्पलाईनवर 10 पैकी 7 फोन

पुरुषांचे

3.

महिलांपेक्षा पुरुष अधिक नैराश्यात

हेल्पलाईनवर मदत मागणाऱ्यांमधील शहरं

प्रथम कोल्हापूर

दुसरं पुणे

तिसरं मुंबई

महिलांपेक्षा पुरुष अधिक नैराश्यात

वयोगट टक्के

12 वर्षांपर्यंत 1.4%

13 के 17 6.5%

18 ते 45 71.1%

46 ते 64 16.4%

65 वयोगटावरील 4.6%

या हेल्पलाईनवर 10 पैकी 7 फोन हे पुरुषांचे येत असल्याची माहिती समोर आली आणि यात राज्यभरात कोल्हापुरातून सर्वाधिक मदतीसाठी फोन आल्याचं समोर आलंय. तर पुणे दुसऱ्या स्थानी असून मुंबई तिसऱ्यास्थानी आहे. तसंच मदतीसाठी कॉल करणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण हे सगळ्यात जास्तयं. त्यामुळे 18 ते 45 वयोगटातील पुरुष हे पिचलेल्या अवस्थेत असून नैराश्येच्या गर्तेत सापडत असल्याचं दिसतं. त्यामुळे महिलाआयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करा अशी मागणी होऊ लागलीये.

हल्ली पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालीये. अनेक पुरुषांना पत्नीनं छळल्याचे, त्यांना मारल्याचे, अगदी जीवे मारल्याच्या घटना रोजच समोर येतायेत. अनेक महिलांनी आपल्या पतीला प्रियकरांसाठी निर्घृण मारल्याचं समोर आलंय. त्यामुळे कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या तणाव आणि स्पर्धात्मक सुप्त संघर्षांमध्ये पुरुषांची घालमेल होत असल्याचं दिसतंय.

कौटुंबिक तानतणावामुळे नैराश्यातून अनेक उच्चशिक्षित तरुणांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना याआधी घडल्याआहेत त्यामुळे नैराश्येत जाणं हे गंभीर जरी असलं तरी ते ओळखणं फार महत्वाचं आहे. नेमकी काय लक्षणं आहेत नैराश्याची पाहूयात

नैराश्याची लक्षणं काय?

थकवा येणे

झोप न लागणं

चीडचीड होणं, अस्वस्थता वाढणं

उदास वाटणे, भूक लागणं किंवा कमी होणं

जर तुम्हाला यापैकी काही लक्षणं असतील तर तुम्ही ताबडतोब वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्या. आणि वेळीच उपचार करुन घ्या. कारण 21 व्या शतकातील सर्वात तरुणांचा देश असणारा भारतात तरुणांमध्ये वाढणारं नैराश्य हे अतिशय चिंताजनक आहे. मात्र पुरूषांवरील वाढणारे अत्याचार आणि वाढलेल्या नैराश्यामुळे आता पुरूष हक्क आयोगाची स्थापना करण्याची वेळ आली आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT