Maharashtra Politics : वक्फआडून शिंदे गटाचा नवा डाव, उद्धव ठाकरेंचा खासदार फुटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

eknath shinde News : वक्फ विधेयकावरुन राजकारण तापलं असतानाच ऑपरेशन टायगरची चर्चा रंगलीय...ही चर्चा आता का सुरु झाली? त्याला कुणी दुजोरा दिला? याबरोबरच खरंच ठाकरे गट फुटणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Eknath shinde news
maharashtra Politics Saam tv
Published On

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झालं... मात्र आता राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरु झाल्यात..त्याला कारण ठरलंय वक्फ सुधारणा विधेयकापुर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य.... तर संपूर्ण उद्धव सेना उद्धव ठाकरेजींना सोडल्याशिवाय राहणार नाही, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हिंदूत्ववादी ठाकरे गटाने वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. मात्र यावेळी ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मतदानाला दांडी मारली. तोच धागा पकडून खासदार श्रीकांत शिंदेंनी आणखी मोठा गौप्यस्फोट केलाय.. तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्याच पक्षप्रवेशाची गळ घातल्याचा दावा बावनकुळेंनी केलाय.

ठाकरे गट फुटीच्या चर्चा सुरु झाल्यानंतर खासदार राऊतांनी आष्टीकरांच्या अनुपस्थितीचं कारण सांगितलंय. खरंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर वारंवार ठाकरे गट फुटीच्या चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं.. त्यातच विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा धुव्वा उडाला.. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.

Eknath shinde news
Pune : रुग्णालयाचा हलगर्जीपणा? जुळ्या बाळांचा जन्म, पण मायेची सावली हिरावली; पुण्यातील धक्कादायक घटना

त्यातच ठाकरे गटाच्या खासदारांनी दिल्लीत एकतेची वज्रमूठ आवळली. मात्र त्यानंतर शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये नागेश पाटील आष्टीकरांचाही समावेश होता..त्यामुळे 2022 च्या विधानपरिषद निवडणुकीप्रमाणेच वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध ठाकरेंना भोवणार का? आणि आष्टीकर शिंदेंच्या गळाला लागणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com