Nobel Prize 2023 The Nobel Prize /Twitter
देश विदेश

Nobel Prize 2023: कोरोना काळात लस निर्मिती करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Nobel Prize 2023: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

Nobel Prize 2023:

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोरोना महामारीत लस निर्मिती करणारे शास्त्रज्ञ कॅटलिन कारिको (Katalin Kariko) आणि ड्रिव वेईसमन  (Drew Weissman) यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. न्यूक्लिओसाइड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी हा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

तीन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे जग मोठ्या संकटात होतं. त्या काळात कोरोनावर कोणत्याही प्रकारचा उपचार नव्हता. या काळात शास्त्रज्ञांकडून औषधांचा शोध सुरू होता. जगभरातील अनेक देश कोरोना महामारीमुळे संकटात होते. अशा काळात शास्त्रज्ञांवर लस निर्मितीसाठी मोठा दबाव होता.

या प्रकारची स्थिती १९५१ साली देखील होती. पिवळ्या तापामुळे जगातील लोक संकटात होते. त्या काळात मॅक्स थीलर यांनी पिवळ्या तापावर लस निर्मिती केली होती.

कोण आहेत यंदाचे मानकरी?

कॅटलिन कारिको आणि ड्रिव वेईसमन यांनी कोरोना विषाणूचा बारकाईने अभ्यास केला. तसेच या शास्त्रज्ञांनी विषाणू लागण झालेल्या रुग्णांचा अभ्यास केला. कोरोना विषाणूव अभ्यास करून लस निर्मिती केल्याबद्दल कॅटलिन कारिको आणि ड्रिव वेईसमन या शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

तत्पूर्वी, नोबेल पुरस्कार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. दरवर्षी हा पुरस्कार जगात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. नोबेल पुरस्कार जाहीर करणाऱ्या समितीमध्ये ५० तज्ज्ञांचा समावेश होता.

नोबेल पुरस्कार प्रदान करण्याची पंरपरा १९०१ सालापासून झाली. नोबेल पुरस्कार १२ महिलांना आतापर्यंत मिळाला आहे. तर . फ्रेडरिक जी बँटिंग यांना ३२ व्या वर्षी पुरस्कार मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं 'कमळ'

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT