Kalyan Latest News: मराठी तरूणाला परप्रांतीय फेरीवाल्यांकडून मारहाण; मनसे कार्यकर्त्यांनी चोपून काढले

Kalyan Latest News: मुंबईच्या मुलुंडमधील मराठी आणि गुजराती भाषिक वाद सुरू असताना कल्याणमध्ये मराठी बोलण्यावरून वाद नवा पेटला आहे.
Kalyan Latest News
Kalyan Latest NewsSaam tv

अभिजीत देशमुख

Kalyan Latest News:

मुंबईच्या मुलुंडमधील मराठी आणि गुजराती भाषिक वाद ताजा असताना कल्याणमध्ये मराठी बोलण्यावरून नवा वाद झालाय. कल्याणमध्ये मराठी बोलण्यावरून एका तरुणाचा परप्रांतीय फेरवाल्यांशी वाद झाला. त्यानंतर या फेरीवाल्यांनी मराठी तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर या वादात मनसेने उडी घेत फेरीवाल्यांना चोप दिला आहे. कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

काल वाशिंद येथे राहणारा तरुण काही कामानिमित्त कल्याणमध्ये आला होता . वाशिंद येथे राहणारा तरुण कल्याण स्टेशनवर आला होता. या तरुणाचा फेरीवाल्यांकडून काही वस्तू विकत घेत असताना मराठी बोलण्यावरून वाद झाला. त्यानंतर चार ते पाच फेरीवाल्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली. या तरुणाने याबाबत मनसे कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Kalyan Latest News
Ac Local: मुंबईत एसी लोकलवर दगडफेक, रेल्वेच्या चार ते पाच काचा फुटल्या; नेमकी काय आहे घटना?

मराठी तरुणाला मारहाण करणाऱ्या चार ते पाच फेरीवाल्यांना बेदम चोप दिला. या फेरीवाल्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे कल्याण स्कायवॉकवर बसणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली. पुन्हा मराठी तरुणांना मारहाण केल्यास मनसे स्टाईलनेच त्यांना उत्तर देऊ, असा इशारा देखील मनसेने दिला आहे.

काय आहे प्रकरण?

वाशिंदमधील एक विद्यार्थी कल्याणमधे काही कामानिमित्त आला होता. घरी परतत असताना रेल्वे स्टेशनवरील स्कायवॉक वर असलेल्या एका फेरीवाल्याकडून एक वस्तू घेतली. या तरुणाला वस्तू थोडी खराब वाटल्याने फेरीवाल्याला पुन्हा दिली. पण फेरीवाल्याने पैसे परत देण्यास नकार दिला.

या फेरीवाल्याने या तरुणाला 'तुम्ही मराठी लोक असेच आहात, असं बोलला. या विद्यार्थ्याने माझ्या भाषेवरून बोलू नका, असं मनसे कार्यकर्त्यांकडे जाईल असं सांगितलं. मात्र, त्यानंतर तीन ते चार फेरीवाल्यांनी या तरुणाला मारहाण केली.

Kalyan Latest News
India Alliance Protest: 'इंडिया' आघाडीचा मोर्चा अडवला; पोलीस- आंदोलक आमनेसामने; मुंबईत काय घडतंय?

या तरुणाने या घटनेबाबत मनसे कार्यकर्त्यांना सांगितलं. मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ स्कायवॉकवर धाव घेतली. त्यानंतर या मनसे कार्यकर्त्यांनी त्या चार-पाच फेरीवाल्यांना शोधून चांगलाच समाचार घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मराठी भाषेचा मराठी तरुणाचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com