Mauni Amavasya Snan SaamTv
देश विदेश

Maha Kumbh 2025 : महा कुंभमेळ्यातील मौनी अमावस्येला स्नान करण्याची पद्धत आणि मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर

Date and Time of Mauni Amavasya Snan: महा कुंभमेळ्यात मौनी अमावस्यानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक, साधू, संत स्नान करण्यासाठी गोळा झाले आहे. उद्याच्या अमृत स्नानाला महत्व आहे. यासाठी स्नानाची पद्धत आणि मुहूर्त देखील महत्वाचे ठरतात.

Saam Tv

हिंदू धर्मात सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. अमावस्येची तिथी ही भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जात असते. मौनी अमावस्येला लाखो वर्षांपूर्वी मनु ऋषी या जगात प्रकट झाले, अशी मान्यता प्राचीन धर्मग्रंथानुसार आहे. त्यामुळे या दिवशी महा कुंभमध्ये होणारे अमृत स्नान हे मोक्ष मिळवण्यासाठी महत्वाचे मानले आहे.

वर्षात १२ अमावस्या तिथी असतात. त्यापैकी अध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची असलेली अमावस्या म्हणूनही मौनी अमावस्येकडे पहिलं जातं. मौनी अमावस्येच्या पवित्र दिवशी, आस्तिकाने भगवान विष्णूचे ध्यान आणि प्रार्थना करणे अपेक्षित आहे. वासना, लोभ, क्रोध आणि मत्सर यासारख्या त्याच्या सर्व सांसारिक आणि भौतिक इच्छांना बाजूला ठेवण्यासाठी वचन दिले जाते. गरजू संतांना अन्न, पैसा आणि वस्त्रे दान करता येते. आणि मग मौन व्रत पाळावे. या सर्व प्रक्रिया अलाहाबाद येथील पवित्र नद्यांच्या संगमाच्या पाण्यात विधीवत स्नान करून केल्या जातात.

यावर्षी महा कुंभमेळा असल्याने या अमावस्येला आणखी महत्व प्राप्त झालं आहे. महा कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नान करण्यात येणार आहे. त्यासाठी लाखों भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. मात्र हे स्नान करण्याची देखील विशिष्ट पद्धत आहे. त्यासाठी काही मुहूर्त देखील देण्यात आलेले आहेत.

२९ जानेवारीला मौनी अमावस्येनंतर आणि ३ फेब्रुवारीला बसंत पंचमीला शाही स्नान होईल. यानंतर १२ फेब्रुवारीला माघी पौर्णिमा आहे. असे मानले जाते की या दिवशी स्नान केल्याने आध्यात्मिक लाभ होतो. यानंतर २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीला स्नान होईल.

मौनी अमावस्या २०२५ शुभ मुहूर्त

पंचांग नुसार, मौनी अमावस्या २८ जानेवारी मंगळवार रोजी संध्याकाळी ७:३५ पासून सुरू होईल. बुधवार, २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६:०५ वाजता संपेल. अशा स्थितीत २९ जानेवारीला मौनी अमावस्येचा सण साजरा होणार आहे. मात्र, मंगळवार, २८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजल्यापासून मौनी स्नान सुरू होणार आहे. मात्र, आखाड्यांचे महास्नान बुधवार, २९ जानेवारीला सकाळीच सुरू होणार आहे.

मौनी अमावस्येला महाकुंभात होणार अमृतस्नान

यावेळी मौनी अमावस्येला महाकुंभात होणार आहे. याची सुरुवात ब्रह्म मुहूर्तापासून होईल. बुधवार, २९ जानेवारी रोजी सुमारे १० कोटी भाविक संगमात स्नान करू शकतील असे मानले जाते. एक दिवसापूर्वी संगमाच्या काठावर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. अमावस्येला पहाटे ५.२५ ते ६.२८ पर्यंत ब्रह्म मुहूर्त असतो. यानंतर विजय मुहूर्त २.२२ ते ३.०५ पर्यंत आणि संध्याकाळचा मुहूर्त २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.१५ ते ६.१५ पर्यंत असेल.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT