Manasvi Choudhary
सुंदर आणि चमकदार त्वचा असावी असे प्रत्येक महिलेला वाटते यासाठी केवळ महागडी सौंदर्य प्रसाधने वापरून नाही तर तुमचा आहार पद्धती कशी आहे हे देखील महत्वाचे आहे.
हिरव्या भांज्याचे ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यासाठी फायदा होतो. स्कीन ग्लो करते.
पालकमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यात लिंबू टाकल्यास व्हिटॅमिन सी मिळते, जे कोलाजन तयार करण्यास मदत करते. चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.
काकडीत पाण्याचे प्रमाण अधिक असते जे त्वचेला हायड्रेट ठेवते. पुदिन्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि त्वचा डिटॉक्स होते. उन्हाळ्यात त्वचेची जळजळ थांबते आणि त्वचा मऊ राहते.
दुधी भोपळ्याचा रस रक्तातील उष्णता कमी करतो. आले अँटी-बॅक्टेरियल असल्याने पिंपल्स येणे थांबवते. चेहऱ्यावरील मुरूम आणि पुरळ कमी होण्यास मदत होते.
कोथिंबीर शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढते, तर आवळा त्वचेचा रंग उजळवण्यासाठी ओळखला जातो. अकाली वृद्धत्व रोखते आणि त्वचा टाईट ठेवते
कढीपत्ता केवळ केसांसाठीच नाही तर त्वचेसाठीही उत्तम आहे. हिरवे सफरचंद त्वचेला नैसर्गिक चमक देते. त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहरा सतेज दिसतो.