Sanitation Workers : ९ वर्षात गटार साफ करताना ६२२ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

India Sanitation Workers Death News : देशात २०१७ ते २०२६ दरम्यान गटार आणि सेप्टिक टँक दुर्घटनांमध्ये ६२२ स्वच्छता कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक कुटुंबांना अद्याप भरपाई न मिळाल्याने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Sanitation Workers : ९ वर्षात गटार साफ करताना ६२२ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
India Sanitation Workers Death NewsSaam Tv
Published On
Summary
  • २०१७ ते २०२६ दरम्यान ६२२ स्वच्छता कामगारांचा मृत्यू

  • लोकसभेत सरकारी आकडेवारीत माहिती उघड

  • अनेक कुटुंबांना भरपाई अद्याप प्रलंबित

  • उत्तर प्रदेश, महाराष्ट्रसह अनेक राज्यांत जास्त मृत्यू

  • कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

In india 622 Sanitation Workers Died Last 9 Years लोकसभेत सादर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, देशात २०१७ ते २०२६ या काळात गटार आणि सेप्टिक टँकच्या दुर्घटनांमध्ये ६२२ स्वच्छता कामगारांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनंतर स्वच्छता कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

लोकसभेत मंगळवारी समाजवादी पक्षाच्या खासदार इक्रा चौधरी यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाला गटार सफाई करणाऱ्या कामगारांच्या पुनर्वसनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशभरातून एकूण ६२२ कामगारांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली. उत्तर प्रदेशात ८६ ,महाराष्ट्रात ८२, तामिळनाडूमध्ये ७७, हरियाणात ७६, गुजरातमध्ये ७३ आणि दिल्लीत ६२ गटार साफ करताना कामगारांचे मृत्यू झाले.

Sanitation Workers : ९ वर्षात गटार साफ करताना ६२२ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Sangli : नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मृतदेह सापडला, सांगलीतील धक्कादायक घटना

धक्कादायक म्हणजे मृत्यू झालेल्या कामगारांपैकी अनेक कुटुंबाना त्याची भरपाई देखील प्रलंबित असल्याचे समोर आले. अनेक राज्यांमध्ये कुटुंबाना भरपाई देण्यात आलेली नाही. मृत्यूंची संख्या आणि नुकसान भरपाई मिळालेल्या कुटुंबांची संख्या यांमध्ये तफावत जाणवत आहे.

Sanitation Workers : ९ वर्षात गटार साफ करताना ६२२ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Accident News : कंटेनरची जोरदार धडक, गाडीचा चेंदामेंदा! तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशात ८६ पैकी १३ कुटुंबांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसून दिल्लीत ६२ कुटुंबांपैकी नऊ कुटुंबांना काहीही मिळाले नसल्याचे द प्रिंट या वृत्त वाहिनीच्या अहवालात म्हटले आहे. या माहितीनंतर स्वच्छता कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com