Maha Kumbh 2025 : कुंभमेळ्यादरम्यान मौनी अमावस्येलाच का करतात अमृत स्नान? जाणून घ्या महत्व | Marathi News

Why Amavsya Snan's Important: २९ जानेवारीला असलेल्या माघ महिन्यातल्या पहिल्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हंटलं जातं. यंदा या दिवशी महा कुंभमेळा असल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
Maha Kumbh 2025
Maha Kumbh 2025SaamTv
Published On

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सध्या महा कुंभमेळा सुरू आहे. १४४ वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यात विविध मुहूर्तांवर शाही स्नान करण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. यात पुढचं अमृत स्नान हे उद्या म्हणजेच २९ जानेवारीला मौनी अमावस्येला होणार आहे. हे अमृत स्नान मौनी अमावस्येलाच का केलं जातं? याच्या मागे हिंदू धर्मात काही कारणं दिलेली आहे. या दिवशी केलेल्या स्नानाला वेगळं महत्व आहे. महाकुंभमध्ये आलेल्या अमावस्येला मोठं महत्व आहे.

सर्व अमावस्या तिथींपैकी हिंदू धर्मात मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. अमावस्येची तिथी ही भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जात असते. त्यातही माघ महिन्यात येणाऱ्या पहिल्या म्हणजेच मौनी अमावस्येला अधिक महत्व दिलं गेलं आहे. प्राचीन धर्मग्रंथानुसार अशी मान्यता आहे की, मौनी अमावस्येला लाखो वर्षांपूर्वी मनु ऋषी या जगात प्रकट झाले. ज्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली तो दिवस म्हणजे मौनी अमावस्या अशी मान्यता आहे.

या दिवशी सूर्य आणि चंद्र मकर राशीत प्रवेश करतात. मौन व्रत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी संपूर्ण मौनाचे व्रत पाळले जाते. त्यातही कुंभमेळ्यात जर मौनी अमावस्येला स्नान केलं तर माणसाच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला मोक्ष मिळतो. मौनी अमावस्येदरम्यान चंद्र आणि सूर्य एकाच राशीत असतात. ज्यामुळे विशिष्ट उर्जेचा संचार होतो. ही ऊर्जा ध्यान धारणेसाठी शुभ मानली जाते.

Maha Kumbh 2025
Breaking News: बागपतमध्ये निर्वाण महोत्सवात मोठी दुर्घटना, स्टेज कोसळून ७ भाविकांचा मृत्यू; ८० जखमी

या काळात पाळले जाणारे मौन व्रत आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना भगवान नारायणाच्या सेवेत गुंतवून ठेवण्यासाठी महत्वाचे मानले जाते. मौनी अमावस्येला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे आणि या दिवशी पवित्र पाण्यात स्नान करणे महत्त्वपूर्ण आणि शुभ मानले जाते.

Maha Kumbh 2025
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर CM फडणवीस, अजित पवार निर्णय घेणार?| Video

ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या मौनी अमावस्येच्या खास मुहूर्तावर चंद्र, बुध आणि सूर्य हे मकर राशीत त्रिवेणी योग तयार करत आहेत. हा एक दुर्लभ संयोग जुळून आलेला आहे. त्यामुळे उद्याच्या अमृत स्नानाला विशेष महत्व आहे. महाकुंभात मौनी अमावस्येला स्नान केल्याने नवीन ऊर्जा आणि दिशा प्राप्त होते. दरम्यान, केवळ कुंभमेळ्यातच नाही, तर इतरही पवित्र नद्यांमध्ये या दिवशी स्नान करून दान केलं तर त्याचंही फळ तुम्हाला मिळू शकतं.

Maha Kumbh 2025
Maratha Protest : धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयात घेतले कोंडून | Video

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com