
उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. बागपत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवाच्या कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेला लाकडी स्टेज कोसळला. या दुर्घटनेमध्ये ७ भाविकांचा मृत्यू झाला तर ८० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये कोसळलेल्या लाकडी स्टेजखाली ५० पेक्षा अधिक जण दबल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवात मनस्तंभ संकुलात बांधलेला लाकडी स्टेज अचानक कोसळला. या दुर्घटनेच ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलिसांनी आणि रुग्णवाहिांनी धाव घेतली. जखमींना तातकडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. या दुर्घटनेमध्ये १५ पोलिस देखील जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
बागपतचे डीएम अस्मिता लाल यांनी सांगितले की, 'बरौत येथे जैन समाजाचा एक कार्यक्रम होता. येथे एक लाकडी स्टेज बांधण्यात आला होता. ही घटना घडली त्यावेळी स्टेजवर आणि जवळ अनेक जण उपस्थित होते. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत जखमींपैकी २० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. इतर जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बरौत शहरातील गांधी रोडवर मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मनस्तंभ संकुलातील बॅटनपासून तयार करण्यात आलेला स्टेज अचानक कोसळला. अनेक जण स्टेजखाली गाडले गेले. एवढेच नाही तर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत पोलिसही जखमी झाले आहेत. जखमींची आणि मृतांची संख्या वाढू शकते. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.